ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

एस टी सेवा सुरळीत करण्यासाठी महामंडळाने शोधला नवा पर्याय

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

एस टी सेवा सुरळीत करण्यासाठी महामंडळाने शोधला नवा पर्याय

मुंबई(प्रतिनिधी):- एसटी कामगारांचा संप सुरू असतांना आता एस टी महामंडळाने नवा पर्याय काढला आहे. एस टी सेवा सुरळीत सुरू व्हावी, यासाठी यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांचा संप काळात चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतच्या निर्णयाच्या परिपत्रकामध्ये म्हटलंय की, राज्य परिवहन महामंडळातील कर्मचा-यांनी बेकायदा संप पुकारला आहे, त्यामध्ये मुख्यत्वे चालक व वाहक यांचा समावेश असल्याने अत्यल्प प्रमाणात वाहने चालनात येत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वाहने चालनात आणण्याकरीता विविध उपाययोजना अमलात आणण्यासाठी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत सर्व अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेअंती यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरिक्षक यांना उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर संपकाळात ‘चालक’ तसेच वाहतूक नियंत्रकांचा ‘वाहक’ म्हणून वापर करण्याबाबत निर्णय झाला आहे.

पुढे म्हटलंय की, या निर्णयानुसार, संप कालावधीमध्ये प्रथम टप्यात चालक पदातून ज्यांना “वाहन परीक्षक” व “सहायक वाहतूक निरीक्षक’ पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. अशा कर्मचा-यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन, त्यांचा वापर प्रवासी वाहनांवर “चालक म्हणून करण्यात यावा, व त्यांच्याकडे प्रवासी वाहन चालक अनुज्ञप्ती बिल्ला असल्याची खात्री करण्यात यावी.

तसेच संप कालावधीमध्ये दुस-या टप्यात ज्या यांत्रिक कर्मचा-यांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे, अशा यांत्रिकी कर्मचा-यांची माहिती विभागीय पातळीवर संकलीत करुन, त्यांचेकडून विभागीय पातळीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये तात्काळ ऑनलाईन अर्ज करुन, प्रवासी वाहन चालक अनुज्ञप्ती बिल्ला काढण्यात यावा. त्याचप्रमाणे सदरच्या यांत्रिकी कर्मचा-यांना ०७ दिवसांचे प्रवासी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण यंत्र अभियंता [ चालन ]. विभागीय वाहतूक अधिकारी व वाहतूक निरीक्षक [ चालक प्रशिक्षण ] यांच्या समितीमार्फत देण्यात यावे व ज्या यांत्रिकी कर्मचा-यांचा प्रशिक्षणानंतर समितीचा अहवाल समाधानकारक राहील, अशा यांत्रिकी कर्मचा-यांचा वापर प्रवासी वाहनांवर “चालक म्हणून करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

error: Content is protected !!