ब्रेकिंग न्युज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊत

पुढील पाच दिवस थंडीचा जोर कायम: भारतीय हवामान विभागाचा अंदाज

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. सूर्योदय महाराष्ट्र

पुढील पाच दिवस थंडीचा जोर कायम: भारतीय हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली: भारताचा बहुतांश भाग सध्या थंडीने गारठला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सतत घसरत आहे. अशावेळी भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस थंडीचा जोर कायम असेल, अशी शक्यता वर्तविली आहे. त्यात उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात पुढील पाच दिवसांत किमान तापमानात सरासरी तीन ते पाच अंश सेल्सियसने घट होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे.
पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांतील काही भागांत पुढील दोन ते तीन दिवस कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पुढील पाच दिवसांत पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र , राजस्थान आणि गुजरातमधील काही भागांत थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. देशातील पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, सिक्कीम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांत काही भागांत दाट धुके पडेल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत आताच पारा घसरून हूडहुडी भरू लागली आहे. मंद वाऱ्यांमुळे थंडी असह्य झाली आहे. अशावेळी हवामान विभागाने दिलेला ताजा अलर्ट महाराष्ट्राच्याही काळजीत भर टाकणारा ठरला आहे. या अलर्टनुसार पुढील ५ दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सियस इतकी हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. त्यातही २५ व २६ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असे ट्वीट कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रात पारा घसरला

नाशिक- ६.६
जळगाव- ९.२
मालेगाव- ९.६
बारामती- १२.५
पुणे- १०.४
चिकलठाणा- १०.२
परभणी- १२.९
नांदेड- १४.६
ठाणे- १९
कुलाबा- १६.२
सांताक्रूझ- १५
माथेरान- ७.६
महाबळेश्वर- ६.५
डहाणू- १३.६
हर्णे- १७.१
सोलापूर- १४
कोल्हापूर- १६.१
उस्मानाबाद- १४.७
सांगली- १६.४

error: Content is protected !!