ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

आता किराणा दुकानात ही मिळणार वाईन

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै महाराष्ट्र सूर्योदय

आता किराणा दुकानात ही मिळणार वाईन

मुंबई (प्रतिनिधी):-राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे.

याबद्दल बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता १००० चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार १ हजार कोटी लीटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे.

सध्या राज्यात वाईनची दरवर्षी ७० लाख लिटरची विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळं हा आकडा १ हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे.
उत्पादन शुल्कानं या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणले आहे. आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

error: Content is protected !!