ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणूक – दिलीप माने, काका साठे, सिद्धेश्वर आवताडे, दिपक माळी यांचेसह 26 अर्ज बाद

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ निवडणुकीच्या अर्ज छाननी मध्ये माजी अध्यक्ष दिलीप माने राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे संचालक दिपक माळी सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 26 जणांचे अर्ज नामनिर्देशन पत्राचा छाननीमध्ये बाद झाले आहेत. विशेष म्हणजे बघ माळ्याच्या आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितशिंदे यांचे क्रियाशील संस्था सभासद मतदार संघ आणि इतर मागासवर्गीय मतदार संघातील दोनही अर्ज मंजूर झाले आहेत.
जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज छाननी सोमवारी जिल्हा दूध संघाच्या सभागृहात झाली निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या उपस्थितीत ही छाननी झाली. या वेळी 35 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यावर दुपारी तीन वाजता सुनावणी घेण्यात येऊन मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये 26 जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

अर्ज बाद झालेल्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे
गुंड नारायण कल्याण,बंडगर अलका श्रीकांत, गलांडे विकास केला, पोटरे हणमंत हरिदास, माळी दिपक राजाराम ,दौलतडे दाजी भिवा, अवताडे सिद्धेश्वर बबन डबल , साठे बळीराम भाऊराव,वावरे संतोष चंद्रकांत, साखरे रेवती रेवणसिद्ध, माने दिलीपराव ब्रम्हदेव डबल, कोरे प्रभाकर गोळाळराव, लवटे ललिता विजय,भोसले सरस्वती विठ्ठल, नवले कौशल्या सुभाष, पाटील संताजी ज्ञानेश्वर, गरंडे तायाप्पा आप्पा, लोंढे संगिता अरूण, भाकरे पांडुरंग भगवान, गुंड विजया श्रीधर, साखरे रेवती रेवणसिद्ध, कसबे मीराबाई मारूती, कोकरे भिमराव बळीराम, पाटील शहाजी हणमंतराव

error: Content is protected !!