ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रीय एजन्सींना पाठीशी लावण्याचा प्रयत्न केला तरी सरकार झुकणार नाही – नवाब मलिक*

*सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रीय एजन्सींना पाठीशी लावण्याचा प्रयत्न केला तरी सरकार झुकणार नाही – नवाब मलिक*मुंबई दि. ३ फेब्रुवारी – भाजपवाल्यानो सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रीय एजन्सींना पाठीशी लावण्याचा प्रयत्न केला तरी सरकार झुकणार नाही असा स्पष्ट इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

ईडी, सीबीआय, एनआयए या केंद्रीय एजन्सींचा दुरुपयोग करुन विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. निवडणुकीच्या आधी शरद पवारसाहेबांना ईडीने नोटीस बजावली.तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या नेत्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आता उत्तरप्रदेशमध्ये ही हेच उद्योग सुरू आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

महाराष्ट्रात आघाडी सरकार झुकत नाही लक्षात येताच अनिल देशमुख असतील किंवा आता संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई करुन अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळे डाव भाजप खेळत आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

देशात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालीय त्यावरुन पाच राज्यातील निवडणूकीतून हे सगळे समोर येणारच आणि या यंत्रणांचा वापर जास्त दिवस चालणार नाही अशी खात्रीही नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!