ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

सुप्रिया सुळे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एका मंचावर

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

सुप्रिया सुळे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एका मंचावर 

पुणे ( प्रतिनिधी):-शिवसेना खासदार संजय राऊत आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत आपण मोठे खुलासे कऱणार असल्याचं जाहीर केलं असून यावेळी ते काय सांगतात याची उत्सुकता आहे. काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत त्यांनी भाजपाला खुलं आव्हान दिलं असून पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मंचावर बोलताना आपण आत्ताच काय ते बोलून घेऊ, तीन वाजल्यानंतर संजय राऊतांचे षटकार असतील असं मिश्कील भाष्य केलं. तसंच कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यांशी बोलतानाही त्यांनी यावर भाष्य केलं.

“मलाही विषय माहिती नाही. दुपारी पत्रकार परिषद होणार असून फक्त राज्य नाही तर देश या पत्रकार परिषदकडे अपेक्षेने बघत आहे. संजय राऊत काय म्हणतात हे पहावं लागणार आहे. पण जेव्हा साधारण ते असा इशारा देतात तेव्हा ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचंच असेल यावर माझा विश्वास आहे,” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

मुंबईत ईडीकडून धाडी सुरु असून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापकर करत दबाव आणला जात आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी संसदेतही या विषयावर बोलले आहे. केंद्र सरकार सातत्याने इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआयचा गैरवापर करत आहे. विरोधी पक्षातच या नोटीस कशा येतात याचा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. विरोधात असताना येणाऱ्या नोटीशी भाजपात गेलात की कुठे जातात ते देवाला माहित. ही दडपशाही असून सातत्याने लोकांना केंद्र सरकार घाबरवत आहे”.

गुजरातमधील बँक घोटाळ्यासंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, “या देशात कोणत्याही राज्यात झालेल्या घोटाळ्याची जबाबदारी केंद्राने घेतली पाहिजे. सात वर्षांपासून यांचंच सरकार देशात असताना मग काय करत होते? याची व्यापक चर्चा संसदेत करणार आहोत”. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या टीव्ही मालिकेप्रमाणे रोज पत्रकार परिषद घेऊन आरोप करत असल्याचा टोला लगावला.

error: Content is protected !!