ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेल का? हे उद्या होईल स्पष्ट

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेल का? हे उद्या होईल स्पष्ट

मुंबई(प्रतिनिधी) :- एसटी महामंडळाच्या शासनात विलिनिकरणावरुन राज्यात सध्या एसटी कर्मचारी संपाव-

र आहेत. यासंदर्भातील अहवाल शासनानं हायकोर्टाकडं सुपूर्द केला असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळं आता कर्मचाऱ्यांचा संप मिटेल का? पुन्हा एकदा एसटीची सेवा सुरळीत सुरु होईल का? हे उद्या स्पष्ट होऊ शकेल.

गेल्यावर्षी २८ सप्टेंबरपासून अद्याप विलिनिकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्यातील गावखेड्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव साधन असलेली ही सेवा बंद झाल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य शासनानं एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन त्यांची राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणं पगारवाढही लागू केली. पण तरीही विलिनिकरणाच्या मागणीवर कर्मचारी अद्याप ठाम आहेत.

दरम्यान, राज्य शासनानं विलिनिकरणाचा अहवाल हायकोर्टात सादर केला आहे. त्यावर उद्या कोर्टाचा निकाल येणार आहे. त्यामुळं संपकरी एसटी कर्मचारी, प्रवाशी यांच्या सर्वांच्या नजरा कोर्टाच्या निकालाकडे लागल्या आहेत.

error: Content is protected !!