ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहावे ‘श्रमसंस्कार निवासी शिबीर , लैंगिक शिक्षण हे काळाची गरज आहे : डॉ. अजयराज बाळ

डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहावे ‘श्रमसंस्कार निवासी शिबीर , लैंगिक शिक्षण हे काळाची गरज आहे : डॉ. अजयराज बाळ

 

कोकण संपादक / भरत सरपरे

 

मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे राज्य शासन व मुंबई विद्यापीठाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहावे ‘श्रमसंस्कार निवासी शिबीर’ दि. २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मंडणगड तालुक्यातील आंबडवे या ठिकाणी आयोजित केले आहे. त्यावेळी शिबिरादरम्यान डॉ. अजयराज बाळ (लैंगिकतेवर बोलू काही) याविषयी मार्गदर्शन करताना हे म्हणाले की “मुले ज्यावेळी वयात यायला लागतात; साहजिक आहे वयात येणे म्हणजे त्यांच्या शरीराची ती नैसर्गिकरित्या बदल घडवणारी गोष्ट असते.याविषयी बोलायचं म्हटलं तर बऱ्याचदा मुद्दा सोडून वादच जास्त आहेत. किती वाद पाहिले होते त्यावेळी बालक पालक चित्रपट तयार करण्यात आला होता. त्याला आता जमाना झाला. पण नंतर सहसा तो विषय तेवढा हायलाईट करण्यात आला नाही.सध्याचा काळ पाहता आणि नवीन पिढीत कुठल्याही गोष्टीबद्दलची वाढती क्युरिऑसिटी पाहता लैंगिक शिक्षण हे मुला-मुलींना द्यावं. काळाची गरज आहे” असे त्यांनी नमूद केली.
यावेळी शिबिरासाठी कार्यक्रमाधिकारी सहा. प्रा. अमोल शिर्के आणि सहा. कार्यक्रमाधिकारी सहा. प्रा. प्रदीप पोवार, सहा. प्रा. अरुण ढंग, विद्यार्थी प्रतिंनिधी अवधूत केळस्कर व कु. मनाली जगताप, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.

error: Content is protected !!