ब्रेकिंग न्युज
मादळमोही कोळगाव सर्कलमध्ये बजरंग सोनवणे यांच्या दौर्‍यामुळे मतदारांमध्ये उत्साहपंकजाताईंच्या विजयासाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांचा विजय संकल्प मेळावातहसीलदार खोमणे साहेब थोडी जनाची नाही तर मनाची तरी राखा व निराधारांची हेडसान थांबवा – राधाकिसन मोटेशारदा कबड्डी अकॅडमीच्या वतीने गेवराईत उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबिर-रणवीर पंडितजयभवानी शिक्षण संकुलात महाराष्ट्र दिन उत्साहात साजराशिक्षकांविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलम

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व खेड तालुका राष्ट्रवादी पार्टी यांच्या वतीने नवाब मलिक यांना तिकडून झालेल्या बेकायदेशीर हटके बद्दल निषेध व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले…

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व खेड तालुका राष्ट्रवादी पार्टी यांच्या वतीने नवाब मलिक यांना तिकडून झालेल्या बेकायदेशीर हटके बद्दल निषेध व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

कुंबळे प्रतिनिधी / अल्पेश भोसले

 

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मंत्री श्री.नवाब मलीक यांना केंद्र सरकारच्या सांगण्यावरून ईडी कडुन झालेल्या बेकायदेशीर अटके बद्दल केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याबतचे खेड तहसीलदार श्री.प्राजक्ता घोरपडे मॅडम यांना दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम व जिल्हाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तसेच राज्याचे मंत्री मा.ना.नवाब मलीक साहेब यांना केंद्राच्या दबावाने सक्तवसुली संचानालय विभागाने (ईडी) काही सुचना तसेच काही नोटीस न देता केवळ सुड बुद्धीने व आकसापोटी दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी जबरदस्तीने ताब्यात घेतले व त्यांच्या कार्यालयात नेले व अटक केली आहे.सदर अटकेची कारवाई ही पुर्णतः चुकीच्या पद्धतीने झाली आहे.म्हणुनच या घटनेचा रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारचा व सक्तवसुली संचानालय विभागाचा जाहीर निषेध करत आहोत.

सदर वेळी दापोली विधानसभा मतदार संघाचे क्षेत्रा अध्यक्ष श्री.मुजीब रूमाणे, गुहागर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य श्री.राजेंद्र आंब्रे,श्री.जलाल राजपुरकर,तालुकाध्यक्ष श्री.सतु कदम, महीला तालुकाध्यक्ष सौ.निधी विठ्मल,मा.युवक तालुकाध्यक्ष श्री.सचिन पवार,जिल्हा परिषद सदस्या नफिसा परकार,अल्पसंख्याक खेड अध्यक्ष श्री.मुख्तार कालेकर,खेड शहराध्यक्ष श्री.राजु शेठ संसारे,युवती शहराध्यक्षा अँड सौ‌.पुजा तलाठी,सवेणी ग्रामपंचायत सदस्य श्री.उमेश देवरूखकर,मा.पंचायत समिती सदस्य श्री.प्रकाश मोरे,मा.पचायंत समिती सदस्य श्री.श्रीधर गवळी,धामणी मा.सरपंच ग्रामपंचायत श्री.उमेश कदम,ऐनव्हरे मा.सरपंच श्री‌.संजय जाधव,भरणे ग्रामपंचायत सरपंच श्री.संदिप खेराडे,पोयनार ग्रामपंचायत सरपंच श्री.विचारे,ग्रामपंचायत सदस्या सौ.पड्याळ वहिनी,हेदली ग्रामपंचायत सदस्या सौ.हिना कुडुपकर,श्री.नितिन डेरवणकर,श्री.प्रदीप सकपाळ,श्री.आप्पा पवार,श्री.बबलु सकपाळ,श्री.आरीफ काणेकर,श्री.खलील कडवेकर,तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!