ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

विंचूर विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा..

 

जनार्दन चव्हाण दै.सुर्योदय प्रतिनिधी

निफाड. ०९.०३.२०२२

विंचूर विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा….
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम लक्ष्मीबाई पाटील व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थितांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षिका एस.ए.खरात यांनी केले. यानंतर तनुश्री दरेकर व सिद्धांत राऊत या विद्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्या शाखाभेटी निमित्त उपस्थित शाखामित्र व संस्थेचे लाईफ वर्कर के.डी.बागले सर यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपशिक्षिका व्ही.आर. दिघे यांनी अध्यक्षीय मनोगताद्वारे महिला दिनाचे महत्त्व व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक के.जी.जोपळे व डी.टी.जोरे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तेजस्विनी थोरात या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे नियोजन रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर राजेंद्र चांदे व उपशिक्षिका के.एम. निकम यांनी केले.

error: Content is protected !!