ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पहिली ते नववी, अकरावीचे वर्ग एप्रिलपर्यंत पूर्णवेळ आणि शंभर टक्के उपस्थितीने सुरू ठेवण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

पहिली ते नववी, अकरावीचे वर्ग एप्रिलपर्यंत पूर्णवेळ आणि शंभर टक्के उपस्थितीने सुरू ठेवण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश

पुणे(प्रतिनिधी) :- करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यभरातील शाळांतील पहिली ते नववी, अकरावीचे वर्ग एप्रिलपर्यंत पूर्णवेळ आणि शंभर टक्के उपस्थितीने सुरू ठेवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी दिले. त्यात शनिवारी पूर्णवेळ तर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्यातील शाळा प्रत्यक्ष स्वरूपात ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. आता करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यातील आस्थापने आणि कार्यक्रमांवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक गुरुवारी प्रसिद्ध केले.

सर्वसाधारणपणे मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यास परवानगी दिली जाते. या शैक्षणिक वर्षांत मार्चपासून एप्रिलअखेपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात करण्याऐवजी पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग असलेल्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात. एप्रिलअखेपर्यंत शाळा शनिवारी पूर्णवेळ, रविवारी ऐच्छिक स्वरूपात सुरू ठेवता येईल. पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात घेऊन निकाल मेमध्ये जाहीर करावा असे नमूद करण्यात आले आहे.

परिपत्रकाला उशीर..

शिक्षण विभागाला परिपत्रक प्रसिद्ध करण्यास उशीर झाला आहे. हे परिपत्रक आधीच प्रसिद्ध करायला हवे होते. १ मार्चपासून शाळा सकाळी सुरू होतात हे शिक्षण विभागाला माहीत असूनही मार्च अखेरीस परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. बऱ्याच शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत, काही शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत. पालकांचे सुटीत गावी जाण्यासाठीचे आरक्षणही करून झाले आहे. मे महिन्यातील कामाबाबत मार्गदर्शन नसल्याचे मत शिक्षकांकडून मांडण्यात आले.

error: Content is protected !!