ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

MPSC Exam | महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात येणाऱ्या यंदाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात आली प्रसिद्ध करण्यात

 

धनंजय कुलकर्णी -उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

MPSC Exam | महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात येणाऱ्या यंदाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात आली प्रसिद्ध करण्यात

मुंबई(प्रतिनिधी) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात येणाऱ्या यंदाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनात अधिकारी म्हणून काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगने (MPSC Exam 2022) प्रसिद्ध केली आहे. विविध पदांसाठी 161 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी उमेदावार कोणत्याही शाखेतील पदवीधर असायला हवे.

या पदांसाठी होणार भरती
1) सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा, गट अ 2022
2) मुख्याधिकारी, गट अ
3) बालविकास प्रकल्प अधिकारी, गट ब
4) सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट ब
5) उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट – ब
6) कक्ष अधिकारी, गट ब
7) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट ब

ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत… या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी आयोगाच्या https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळाला भेट द्यावी. 12 मे ते 1 जून पर्यंत परीक्षेसाठीसाठी अर्ज करता येणार आहे.

error: Content is protected !!