ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

भोसरी विधानसभेतील ‘बैलगाडा शर्यत’ इतिहासातील सर्वात मोठी शर्यत ठरणार

दैनिक सूर्योदय पुणे
२५ मे २०२२
चिखली :  भोसरी विधानसभेचे आमदार मा.महेशदादा किसनराव लांडगे यांच्या नियोजनाखाली पिंपरी चिंचवड येथील चिखली येथे होत असलेली बैलगाडा शर्यत हि इतिहासातील सर्वातमोठी बैलगाडा शर्यत ठरणार आहे. बक्षिसांची रक्कम आणि शर्यतीत भाग घेण्यासाठी येणाऱ्या बैलगाड्यांची संख्या पाहता न भुतो न भविष्यती असा हा सोहळा पार पडणार आहे असा आयोजकांचा दावा आहे. बैलगाडा शर्यत सुरु झाल्यानंतर ग्रामीण तसेच शहरी भागात बऱ्याच ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे घाट भरू लागले आहेत परंतु सर्वाना प्रतीक्षा होती ती म्हणजे बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या आमदार महेशदादा लांडगे यांच्या शर्यतीच्या आयोजनाची. ती प्रतीक्षा आता संपणार असून दादांनी येत्या २८ मे पासून ३१ मे पर्यंत, तब्बल ४ दिवस बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या ठिकाणी फक्त पुणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून बैलगाडा मालक सहभागी होणार आहेत.
      या संदर्भात आयोजक माजी महापौर मा. राहुलदादा जाधव यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले कि, शर्यतीसाठी आतापर्यंतची सर्वात मोठ्या रक्कमेची आकर्षक आणि किमती बक्षिसे ठेवण्यात आली असून शर्यतीची अतिशय नियोजनबद्ध तयारी करण्यात आलेली आहे.
       भोसरीत भरणाऱ्या इंद्रायणी थडी ला भेट देणाऱ्या लाखो लोकांना दादांच्या कार्यक्रमाचे नियोजन कसे असते या संबधी कल्पना आहे. दादांची टीम आणि बैलगाडा प्रेमींनी सर्व गोष्टींचे अतिशय बारीक नियोजन करून बाहेरून आलेल्या कोणत्याही गाडा मालकाची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यात आलेली आहे. त्यासाठी शेकडो स्वयंसेवक व कार्यकर्ते तैनात राहणार असून बैलगाडा आल्यानंतर पार्किंग पासून परत जाई  पर्यंत कोणतीही समस्या उद्भवणार नाही असे नियोजन करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन होणार असून प्रकाश जावडेकर व अन्य मान्यवर शर्यत स्थळी भेट देणार आहेत, अशी माहिती माजी महापौर राहुल जाधव यांनी दिली.
  आमदार महेश दादा लांडगे स्वतः शर्यतस्थळी उपस्थित राहून तयारीचा आढावा घेत असल्याचे दिसून आले, त्यांच्या सोबत माजी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, स्थानिक नगरसेवक व परिसरातील बैलगाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!