ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

सेवा विवेक सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी महिलांचा स्वयंरोजगारासाठी बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण:-

सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त होवा ह्यातूने सेवा विवेक ने पुढाकार घेतला आहे. अश्या महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जात आहे .सेवा विवेक मार्फत बांबू हस्तकला स्वयंरोजगार निर्मिती सह बहुउदेशाने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण वर्गाच्या १५ व १६ तुकडीची सुरवात दहिसर व धुकटन दांडेकरपाडा येथे झाली.
३० दिवस चालणाऱ्या प्रशिक्षनाचा ७० आदिवासी महिला मोफत लाभ घेणार आहेत. प्रशिक्षण शिबीराची उदघाटन प्रमुख पाहुणे हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अधक्ष व सेवा विवेक चे मार्गदर्शक श्री रमेश पतंगे , धुकटन दांडेकरपाडा चे सरपंच प्रसाद भोईर , दहिसर येथील शिक्षक दशरथ केनी सर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड, प्रशिक्षण व विकास अधिकारी सौ. प्रगती भोईर या मान्यवरांच्या हस्ते झाले. मान्यवरांनी महिलांना बांबू हस्तकलेचे महत्त्व सांगितले. त्यापासून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराची माहिती देत त्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
पालघर तालुक्यातील दहिसर देवलीपाडा आणि धुकटन दांडेकरपाडा येथील प्रशिक्षण वर्गाला कुशल बांबू हस्तकला शिकलेल्या सेवा विवेक संस्थेतील कुशल प्रशिक्षक महीलान द्वारेच हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सेवा विवेक च्या ग्रामपातळीवर बांबू ग्रामोद्योग उत्पादनाच्या माध्यमातून पालघर जिल्हातील ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने बांबू पासून अनेक आकर्षक वस्तू तयार करण्यात येत आहेत या उद्योगासाठी मागील काही वर्षांपासून पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडो हून अधिक महिलांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबू पासून उत्तम दर्जेदार प्रयावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.
यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे कंदील ,राखी ,पेन होल्डर ,मोबाईल होल्डर , पात्राधर , फिंगर जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार होत असून उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे.
या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मिती वर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची संधी मिळाली आहे .

error: Content is protected !!