ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

घर जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या कामाची दखल, सुधीर मुनगंटीवार आणि मंगल प्रभात लोढा यांनी केले आदीवासी महिलांचे कौतुक

पालघर –

सेवा विवेक सामाजिक संस्थेच्या पालघर जिल्हातील आदिवासी महिलांतर्फे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि प्रर्यटन, महिला व बालविकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांना बांबूपासून हस्तकले द्वारे बनवलेल्या वस्तू भेट दिल्या. त्या प्रसंगी त्यांनी सेवा विवेक च्या कार्याचे कौतुक केले व आदिवासी महिलांची भेट स्वीकारताना दोन्ही मंत्री महोदयांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्या प्रसंगी हिंदुस्थान प्रकाशनचे अध्यक्ष रमेश पतंगे,विवेक साप्ताहिक चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर ,सेवा विवेक चे मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड, सौ. राजकुमारी गुप्ता -समाजसेवक, प्रशिक्षण व विकास अधिकारी प्रगती भोईर संस्थेसोबत काम करणाऱ्या आदीवासी बांबू कारागिर महिला नम्रता सांबरे आणि रजनी सांबरे उपस्थित होत्या. साप्ताहिक विवेक आयोजित विनित तेलंग यांनी लिहलेल्या, लतादीदींच्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि प्रर्यटन, कौशल्य विकास आणि उधोजकात, महिला व बालविकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा, जेष्ठ गायक आणि संगीतकार श्री श्रीधर फडके यांच्या हस्ते झाले.सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर काम करत आहे जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त होवा ह्यातूने सेवा विवेक ने पुढाकार घेतला आहे. अश्या महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते.पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडो हून अधिक महिलांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबू पासून उत्तम दर्जेदार प्रयावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे. ह्या वर्षी महिलांनी बनवलेल्या राखी व कंदीलांना विदेशातही मागणी होती.तसेच वर्षभर महिला इतर वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करतात यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे पेन होल्डर ,मोबाईल होल्डर , पात्राधर , फिंगर जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार करतात.या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मिती वर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला घरची जबाबदारी स्वीकारून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहे.गेल्या वर्षी सेवा विवेक च्या कार्याचा माजी राष्ट्रपती व महामहीम राज्यपाल यांनी कौतुक केले आहे.माजी राष्ट्रपती द्वारे हस्तकला प्रशिक्षित आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला.आज संस्थेतील अनेक प्रशिक्षण घेतलेल्या महिला ह्या संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत तसेच नवीन महिलांना त्या प्रशिक्षण देत आहेत . या मुळेच आदिवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.

error: Content is protected !!