ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली सेवा विवेक च्या महिला सक्षमी करणाच्या कार्याची प्रशंसा.

 

पालघर-

सेवा विवेक चे संचालक दिलीप करंबेळकर व सेवा विवेक चे मुख्य कार्यकारी अधिकारी लूकेश बंड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालय, डॉ. हेडगेवार भवन,महल,नागपूर येथे भेट घेतली.
त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांना संस्थेचा कार्याची माहिती लूकेश बंड यांनी दिली.सरसंघचालकानी सर्व माहिती समजून घेतल्यावर संस्थेच्या महिला सक्षमी करणाचे विशेष कौतुक केले .यावेळी दिलीप करंबेळकर व लूकेश बंड यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना सेवा विवेक संस्थेचे माहितीपत्रक व आदिवासी महिलांनी बांबु हस्तकले द्वारे तयार केलेल्या वस्तू भेट दिल्या. या वस्तू सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रचंड आवडल्या .त्यांनी आदिवासी महिलांच्या कलेचे कौतुक केले .
सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त होवा ह्यातूने सेवा विवेक ने पुढाकार घेतला आहे. अश्या महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते.पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडो हून अधिक महिलांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबू पासून उत्तम दर्जेदार प्रयावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.
उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे.
ह्या वर्षी महिलांनी बनवलेल्या राखी व कंदीलांना विदेशातही मागणी होती.तसेच वर्षभर महिला इतर वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करतात यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे पेन होल्डर ,मोबाईल होल्डर , पात्राधर , फिंगर जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार करतात.
या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मिती वर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला घरची जबाबदारी स्वीकारून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहे.
गेल्या वर्षी सेवा विवेक च्या कार्याचा माजी राष्ट्रपती व महामहीम राज्यपाल यांनी कौतुक केले आहे.माजी राष्ट्रपती द्वारे हस्तकला प्रशिक्षित आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला.
आज संस्थेतील अनेक प्रशिक्षण घेतलेल्या महिला ह्या संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत तसेच नवीन महिलांना त्या प्रशिक्षण देत आहेत . या मुळेच आदिवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे

error: Content is protected !!