ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अमृतपालच्या शोधात नांदेड पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

 

वारीस दे पंजाब या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगचा शोध अजूनही सुरू आहे. आठ दिवस उलटून गेले तरी अमृतपाल सुरक्षा यंत्रणांना सापडत नाही. तर पंजाबसह देशभरातील वेगेवेगळ्या राज्यातील पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणाही त्याचा शोध घेत आहे. दरम्यान नांदेड शहरात देखील अमृतपाल सिंगचे समर्थक असल्याने स्थानिक पोलीस अलर्ट झाली आहे. नांदेड पोलिसांकडून रात्री शहरातील काही भागात अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवून घरांची झाडाझडती घेण्यात आली आहे. तसेच नांदेड पोलीस लक्ष ठेवून आहे.

खलिस्तानवादी अमृतपाल सिंगला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केले आहे. त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. तर तो पंजाबमधून फरार झाला असल्याचे समोर आले आहे. नांदेड शहरात देखील वारीस दे पंजाब या संघटनेचे अनेक सदस्य आहेत. तसेच काही तरुण भिंद्रानवालेचेचे छायाचित्र आपल्या सोशल मीडियाच्या स्टेट्सवर ठेवतात.

तसेच अशा परिस्थितीत अमृतपाल नांदेडात येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. त्यामुळे नांदेड पोलीस अलर्ट झाली असून, पोलिसांनी शनिवारी रात्री शहरातील काही भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविले आहे. यावेळी अनेकांची कसून चौकशी देखील करण्यात आली. विशेष म्हणजे नांदेड शहरात सोशल मीडियाद्वारे सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलकडून सोशल मीडियावर वॉच ठेवण्यात येत आहे.

error: Content is protected !!