ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

मंडणगड नगरपंचायत शहराच्या विकास कामांच्या अमंलबजावणीत सत्ताधारी पुर्णपणे अपयशी ठरल्याची टिका…. विरोधी गटनेता विनोद जाधव

मंडणगड नगरपंचायत शहराच्या विकास कामांच्या
अमंलबजावणीत सत्ताधारी पुर्णपणे अपयशी ठरल्याची टिका…. विरोधी गटनेता विनोद जाधव

मंडणगड प्रतिनिधी दि. 29-

पाणी समस्या, कचरा प्रश्न, यावर दुरदृष्टीने नियोजनात्मक काम नसल्याने मंडणगड नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांची कार्यपध्दती शहरातील नागरीकांसमोर आली असून शहराच्या विकास कामांचे अमंलबजावणी सत्ताधारी पुर्णपणे अपयशी ठरल्याची टिका विरोधी गटनेते विनोद जाधव यांनी शहर विकास आघाडीच्यावतीने 29 जून 2023 रोजी मंडणगड नगरपंचतीत आयोजीत पत्रकार परिषदेत केली. यावेळी नगरसेवक आदेश मर्चंडे, निलेश सापटे, योगेश जाधव, नगरसेवीका वैशाली रेगे, सेजल गोवळे, उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना श्री. जाधव पुढे म्हणाले कचरा डेपोच्या जागेवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कचरा नेण्यासाठी गाडीचा रस्ता करण्यात आलेला नाही परिणाम भर पावसाळ्यात रस्त्याअभावी दोन दिवसांपासून शहरातील कचरा न उचलण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली आहे. विकासाच्या निधीच्या व्याजातून खड्डे भरणी करण्यात आली मात्र गतवर्षीचा सुध्दा भेडसावलेला कचरा डेपोपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न सोडवीता आलेला नाही. यामागे सत्ताधाऱ्यांची नकारात्मक नकारात्मक मानसीक उदासीनता कारणीभूत असून शहरवासीयांना होणाऱ्या त्रासासी त्यांनी काहीच देणेघेणे नसल्याचे यावेळी सांगीतले. पाणी टंचाई व कचरा प्रश्न याबाबत भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींबाबत संबंधीत कर्मचाऱ्यांनीसुध्दा संबंधीतांना आगावू लेखी पत्रकाद्वारे कळवीले असतानासुध्दा त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेले नाही. काम करण्याची मानसीकता जर नसेल तर त्यांनी सत्तेपासून दूर व्हावे, कारण विरोधकांनी शहराच्या विकासाकरिता निधी आणला असता ते खर्ची पडू नये किंवा त्यांची कामे होवू नयेत यासाठी संबंधीत विभागाकडे लेखी पत्रव्यवहार करुन तांत्रीक अडचणींचा अडथळा निर्माण केला आहे. शहर विकासाकरिता नगरसेवकांकडून अनेक विकास कामे सुचविण्यात आलेली आहेत मात्र त्यांचे प्रस्ताव सत्ताधारी देत नाहीत. यावरुन त्यांची शहर विषयी असणारी मानसीकता स्पष्ट होत आहे. उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यानी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेत्यावर केलेल्या सर्व आरोपांचे खंडन करताना श्री. जाधव म्हणाले की गेली पंचवीस वर्षे ग्रामपंचायतीपासून नगरपंचायतीपर्यंत महत्वाची पदे वैभव कोकाटे यांच्या कुटुंबातील सदस्य व स्वताः त्यांनी भुषविली आहेत. या पंचवीस वर्षात असा कोणता विकास त्यांनी केला आहे असा प्रश्न उपस्थित करताना आजही त्या समस्या तितक्याच गंभीर स्वरुपाच्या असल्याची आठवण करुन दिली सत्ता राबविता न आल्याने वैफल्यग्रस्त होवून ते व्यक्तीगत पातळीवर टिका करीत आहेत. नगरपंचायतीच्या सभेत ठराव होतात मात्र त्याची अंमलबजावणी मात्र शुन्य आहे. शहराच्या विकास कामांच्या निधी संदर्भात सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्री व आमदार यांची कधीही भेट घेतलेली नाही.यावरुन यांना विकासकामे हवीत पण त्यासाठी करावा लागणार पाठपुरावा नको अशी खोचक प्रतिक्रीया दिली. आमच्यावर कितीही खालची व व्यक्तीगत पातळीवरील टिका झाली तरीही यापुढेही शहरवासीयांच्या प्रश्न आणी समस्यासाठी विरोधक म्हणून वेळप्रसंगी आंदोलन करुन या सत्ताधाऱ्यांनी कामे करण्यास भाग पडणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगीतले. डिपींग ग्राऊंडची जागा ही दहा ते वीस लाख रुपयांची होती ती करोडो रुपयात घेण्यात आली असून विद्यमान उपनगराध्यक्ष यांची जागेच्या खरेदी खतावर स्वाक्षरी असल्याने त्यांचा या भ्रष्टाचारात सहभाग तर नाही ना असा सवाल उपस्थित करताना कुंपणच शेत खाते आहे जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा टोला लागवीला. शहरवासीयांनी आपेक्षीत असणारी विकास कामे न करता नगरपंचायतीचे इमारतीवर पच्चाहत्तर लाख रुपयांचा खर्च सत्ताधाऱ्यांनी केला मात्र यंदाच्या पावसात इमारतीला गळती लागली अगदी खर्च करण्यात आलेला नवीन सभागृह सुध्दा गळत आहेत. पाणी प्रश्नावर विरोधकांनी केलेल्या आंदोलनाच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या प्रतक्रियेनंतर विरोधकसुध्दा चांगलेच आक्रमक झालेले असल्याचे पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले आहे.

error: Content is protected !!