ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

समृद्धी लांडगे हिच्या अप्रतिम खेळीने रोमहर्षक कबड्डी सामन्यात महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश संघावर विजय

०२ फेब्रुवारी २०२४
दैनिक सूर्योदय पुणे
भोसरी  :– अष्टपैलू कबड्डीपटू समृद्धी कार्तिक लांडगे हिने शेवटच्या क्षणी केलेल्या अप्रतिम खेळीने महाराष्ट्र मुलींच्या कबड्डी संघाने उत्तरप्रदेशवर संघावर ४ गुणांनी विजय मिळवला. या रोमहर्षक विजयामुळे महाराष्ट्राने कांस्यपदकावर मोहोर उमटवली.
राजम पेठ, आंध्रप्रदेश येथे झालेल्या १४ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये मुलींच्या महाराष्ट्र संघाने उत्तरप्रदेश संघाचा ५२/४९ असा ४ गुणांनी पराभव करत कास्यपदक पटकावले. अत्यंत चुरशीचा झालेल्या सामन्यात पिंपरी-चिंचवडची अष्टपैलू कबड्डीपटू समृद्धी लांडगे हिने महाराष्ट्राच्या संघाकडे विजय खेचून आणला.
कांस्यपदकासाठी महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश संघामध्ये अतितटीचा सामना झाला. शेवटचे काही सेकंद बाकी असताना ५२/४९ अशा 3 गुणांची आघाडी महाराष्ट्र संघाकडे होती. त्यावेळेस मैदानात महाराष्ट्र संघाचे समृद्धी लांडगे आणि आरती खांडेकर हे केवळ दोनच खेळाडू उरले होते. उत्तरप्रदेश संघ महाराष्ट्र संघाला लोन देऊन ५३/५२ अशी १ गुणाची आघाडी करत सामना जिंकणार असे चित्र दिसत होते. मात्र, चढाईसाठी महाराष्ट्र संघाकडून पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संघाची अष्टपैलू खेळाडू समृद्धी लांडगे हिने राईड केली असता क्रॉस लाईनवर तिला पकडण्या प्रयत्न प्रतिस्पधी उत्तरप्रदेश संघाच्या खेळाडुंनी केला. समृद्धीने क्रॉस लाईन करत १ गुणांची कमाई केली आणि महाराष्ट्रावर पडणारा लोन वाचवला आणि एक खेळाडू बाद करीत महाराष्ट्राकडे विजय खेचून आणला. ५३/४९ अशा फरकाने महाराष्ट्राच्या संघाने स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. तसेच, महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश, नवोदय विद्यालय, केरळ आणि पंजाब या संघाचा पराभव करून राष्ट्रीय स्पर्धेत वर्चस्व राखले आहे. महाराष्ट्र संघातून पुण्याची अष्टपैलू खेळाडू समृद्धी कार्तिक लांडगे, निकिता जाधव, सेरेना मस्कर, यशश्री इंगोले यांनी केलेल्या यशस्वी चढाया केल्या. तसेच, आरती खांडेकर, भूमिका माने, मृदुला मोहिते यांनी केलेल्या पकडी उत्कृष्ट ठरल्या. त्यांना श्रेया कुबरे, प्रतीक्षा राठोड, सेजल काकडे, अनुष्का चव्हाण यांनी उत्कृष्ट साथ दिली.
प्रशिक्षक भगवान सोनवणे, महेंद्र ढाके, श्रद्धा गंभीर यांनी मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!