ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदाराकडून गोळीबार; पोलीस ठाण्यातच घडला थरार, मुंबईत खळबळ

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदाराकडून गोळीबार; पोलीस ठाण्यातच घडला थरार, मुंबईत खळबळ

मुंबई (प्रतिनिधी):-मुंबईच्या उल्हासनगर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

धक्कादायक बाब म्हणजे, हिललाईन पोलीस ठाण्यातच शुक्रवारी (२ फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार थरारक प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

गोळीबाराची माहिती मिळताच भाजपसह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोरच मोठी गर्दी केली होती. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील आमदाराची गोळीबार करण्यापर्यंत मजल जातेच कशी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?
कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यात नेहमीच वादावादी तसेच आरोप प्रत्यारोप होत होते. वरिष्ठांनी मध्यस्थ केल्यानंतर देखील दोघांमधील धूसफूस कायम होती . शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले.

प्रकरण हिललाईन पोलीस ठाण्यापर्यंत गेलं. यावेळी संतापलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एकापाठोपाठ एक ५ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. तर त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांना देखील गोळी लागली.

याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथामिक माहिती आहे. या घटनेनंतर कल्याण पूर्वेत पुन्हा भाजप व शिंदे गट आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्वेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

error: Content is protected !!