ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

श्री क्षेत्र अश्वतथलिंग महादेव मंदिर देवस्थानं पिंपळवंडी येथे संघर्ष योद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती

अंमळनेर प्रतिनिधी दि . ८
*श्री क्षेत्र अश्वतथलिंग महादेव मंदिर देवस्थानं मौजे पिंपळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील वार्षिक महाशिवरात्री महोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा*
अनुषंगाने
कार्यक्रमाच्या शनिवार दिनांक 09/03/2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन ह.भ.प.गुरुवर्य महंत श्री श्री 1008 स्वामी महादेवानंदजी भारती महाराज यांचे काल्याचे किर्तन* होणार आहे या प्रसंगी
*मराठा आरक्षण संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटिल यांची प्रमुख* *उपस्थिती असणार आहे. तरी,मनोज दादा ह्यांच्या आगमनाच्या पार्शवभूमीवर पिंपळवंडी आणि परीसर तसेच अंमळनेर आणि परीसरा मधून समस्त पाटोदा तालुक्यातील भाविक वर्ग,गरजवंत समाज बांधव यांनी मिळून भव्य नियोजन करण्यात आले आहे .
आपण येणाऱ्या 9 मार्च 2024 रोजी अश्वत्थलिंग संस्थान पिंपळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होत असताना त्यांच्या स्वागतासाठी आपण हजारों संख्येने येणार आहात. अशातच उन्हाची तीव्रता सुद्धा वाढत आहे. त्यामुळे आपणा सर्वांना स्वतःची आणि येणाऱ्या आबाल वृद्धांची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. येताना प्रत्येकाने डोक्यावरती एखादे उपरणे, रुमाल, टॉवेल तसेच मुलींनी व महिलांनी डोक्यावरती ओढणी , लहान मुलांचे डोक्यावरती टोपी अशा प्रकारचे साहित्य सोबत आणावे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे . तरीपण आपली स्वतःची एक पाण्याची बॉटल आपल्या सोबत आपण घ्यावी . सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य.🚩

error: Content is protected !!