ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

महात्मा फुले नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

महात्मा फुले नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

संविधान हे देशासाठी काम करण्याची प्रेरणा देते – पोलीस निरीक्षक महेश पाटील

जामखेड प्रतिनिधी;-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला संविधान दिले आहे.त्याच वाटेवर आम्ही सर्व लोक चालत आहोत. त्यांच्या स्मृती आम्हां सगळ्यांना आयुष्य समाधान आणि देशासाठी काम करण्याची प्रेरणा देते असा विश्वास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी व्यक्त केला.

जामखेड शहरातील महात्मा फुले मित्र मंडळ, जामखेड यांच्या वतीने महात्मा फुले नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भगवान गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील, राहुल उगले, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, प्रकाश सदाफुले, सिध्दार्थ साळवे,नगरसेवक मोहन पवार,राजेश वाव्हळ, शिवाजी डोंगरे,महात्मा फुले नगर चे अध्यक्ष रवि सोनवणे, विनोद सोनवणे,बापूसाहेब गायकवाड, जयदीप शिंदे, नाना मेघडंबर,दिपक तुपेरे, जितेंद्र आढाव,राजन समिंदर, रजनीकांत साखरे, शिवाजी ससाणे,नितीन वाव्हळ,संदीप तुपेरे, विनोद घायतडक,प्रताप पवार, महेंद्र कदम,विजय जाधव,सुशिल पौळ, बौध्दाचार्य बलभीम जावळे,अशोक घोडेस्वार, कुंडल राळेभात, पांडुरंग समुद्र,अजिनाथ शिंदे, सुशीलकुमार सदाफुले, विक्रांत घायतडक,सागर जाधव, सचिन सदाफुले, दादा घायतडक,प्रिन्स सदाफुले,जाॅकी सदाफुले,विजय साळवे, सुजित धनवे, लहु पवार, प्रमोद सदाफुले,बाबासाहेब काळे तसेच माहिला भारतीय बौद्ध महासभेच्या सुरेखा सदाफुले, नगरसेविका विद्या वाव्हळ, शोभा कांबळे,अर्चना भोसले,निशा कदम आदी भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले नगर चे अध्यक्ष रवि सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारतळे, बाजारतळ, तपनेश्वर रोड, खर्डा चौक, जयहिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ , संविधान चौक या मार्गावर प्रभात फेरी काढण्यात आली.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

error: Content is protected !!