ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ डॉ.योगेश क्षीरसागर यांचा बैठकांचा सपाटा

पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ डॉ.योगेश क्षीरसागर यांचा बैठकांचा सपाटा
चौसाळा जिल्हा परिषद गटातील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
बीड प्रतिनिधी;-दि.१७ : महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बैठक, कॉर्नर बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यांनी बुधवारी (दि.१७) बीड तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद गटातील प्रमुख सहकाऱ्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आपण पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.
डॉ. योगेश क्षीरसागर यांनी चौसाळा जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी सर्व सहकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागावे. पंकजाताईंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ.सारिकाताई क्षीरसागर, माजी पं.स.चे माजी सभापती काकासाहेब जोगदंड, शिवसेना मा.जिल्हाउपाध्यक्ष प्रा.आबासाहेब जाधव, मोहनराव झोडगे, अशोक सोनवणे, शुभम कातांगळे, सरपंच सुनिल अनपट, संतोष तांदळे, गणेश काकडे, राजाभाऊ क्षीरसागर, विवेक भोसले, पंकज शिंदे, मधुकर काळे, शहाजी चौधरी, बबलू शिंदे, अरुण सोनवणे, मोहन जोगदंड, अरुणकाका जोगदंड, सौ.फुलाबाई पवार, बालाजी ढास, इम्रान जागीरदार, अनिल पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्याचा प्रवेश
चौसाळा येथील बैठकीत अंजनवतीचे उपसरपंच कृष्णा मोरे, ग्रा.पं. सदस्य पांडुरंग येडे यांच्यासह काही युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
चौकट
बैठकीनंतर डॉ.योगेश क्षीरसागर दिवसभर पंकजाताईंसोबत दौऱ्यात
चौसाळा येथील बैठकीनंतर डॉ.योगेश क्षीरसागर महायुतीचे उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्यासोबत दिवसभर दौऱ्यात सोबत होते. बीडमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ प्रज्ञावंतांचा मेळावा पार पडला. यावेळी डॉ.क्षीरसागर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित संबोधित केले. तसेच, पंकजाताई मुंडे यांच्यासमवेत शहरातील संत सावता माळी यांच्या नियोजित मंदिर जागेची पाहणी केली. त्यानंतर बीड शहरातील श्रीराम नवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी होऊन पंकजाताई यांच्यासमवेत श्रीरामाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
error: Content is protected !!