ब्रेकिंग न्युज
युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडेकुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरमा.श्री.ना. मंत्री छगन भुजबळ यांच्या शहरातील स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत आ.संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणेंसह बालाघाटावरआमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीरमिल्लिया महाविद्यालयात मतदार जनजागृती शीलाचे पालन, एकाग्रतेने मनावर ताबा हाच सद्धम्माचा मार्ग आहे- पु.भंते रत्नदीप थेरोनारळी सप्ताहाच्या समारोपाला घोगस पारगावला उसळला अभूतपूर्व जनसागर!

तत्काळ आपत्ती निवारण मधून मदत द्या:- राजेंद्र आमटे 

तत्काळ आपत्ती निवारण मधून मदत द्या:- राजेंद्र आमटे

उमेदवार प्रचारात दंग, अधिकारी सुस्त, शेतकरी उद्ध्वस्त
बीड (प्रतिनिधी);- अचानक होत असलेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीट यामुळे शेतकऱ्याच्या शेतात उभे असणारे आंबा, मोसंबी, उन्हाळी बाजरी, ज्वारी,टरबूज,खरबूज पिकाची नासाडी झाली. अनेकांचे आंबा, मोसंबी बागा मोडल्या, बाजरी ज्वारी लोळू लागले आहे. टरबूज खरबूज पिकांची पावसामुळे नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांचे गोठे मोडले, प्रशासनातील अधिकारी आचारसंहितेच्या नावाखाली सुस्त आहेत एरवी शेतकऱ्याच्या नावावर मताचा जोगवा मागणारे लोकप्रतिनिधी उमेदवार आज शेतकरी अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीने उद्ध्वस्त झालेला असून उमेदवार प्रचारात दंग आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्याने विचार करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तत्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, तालुका अध्यक्ष अर्जुन सोनवणे, रमेश जगताप, संपत गव्हाणे, संजय तीपाले, सुधाकर काकडे, कृष्णा मसुरे, शेलेश सुरवसे, कैलास शेजवळ,आदीच्या वतीने मागणी करण्यात येते
error: Content is protected !!