ब्रेकिंग न्युज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊत

जामखेड येथे भाजपा बुथ कमिटी प्रमुखांचा मेळावा संपन्न

जामखेड येथे भाजपा बुथ कमिटी प्रमुखांचा मेळावा संपन्न

जामखेड कर्जत मधून डॉ सुजय विखेंना मोठे मताधिक्य देऊ – आमदार प्रा राम शिंदे

जामखेड प्रतिनिधी;-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी खा. सुजय दादा विखे पाटील यांच्या रुपाने उमदा शिलेदार याला निवडून पाठवायचे आहे. जामखेड कर्जत मधून मोठे मताधिक्य देऊन त्यांच्या विजयासाठी बुथ स्थरावर नियोजन करण्याचे आवाहन माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी केले.

जामखेड तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील राजेवाडी, धानोरा अणखेरीदेवी येथील भाजपा बुथ कमिटीच्या प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले की आज संपूर्ण भारतातील लोकांची राम मंदिर व्हावे म्हणून इच्छा होती.ही इच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहे.यामुळे त्यांच्या हमीवर देशाचा विश्वास निर्माण झाला आहे.
आ. राम शिंदे म्हणाले की, विरोधी आमदारांनी सांगितले की जामखेडला कुकडीचे पाणी देतो, पण त्या दिवसापासून आजपर्यंत लोक खोर घेऊन दारावर लोक पाण्याची वाट बघत आहेत. पण अद्यापही पाणी काही आले नाही. लोक तुमच्या खोट्या भुलथापांना बळी एकदा बळी पडले होते, आता पडणार नाहीत याचा विश्वास आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, गेल्या ५० वर्षापासून आमचे कुटुंब जनतेच्या सेवेत आहे. यामुळे सातत्याने जनतेने आम्हाला आशिर्वाद देऊन सत्तेत ठेवले आहे. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ मिळाल्याने जिल्ह्याचा विकास अधिक झपाट्याने होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपली विकास कामे घराघरात पोहचवा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अजय काशीद, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर,जामखेड बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवि सुरवसे, नगरसेवक अमित चिंतामणी, एडवोकेट बंकटराव बारवकर,प्रविण सानप,बिभीषण धनवडे, डॉ ज्ञानेश्वर झेंडे, शहराध्यक्ष पवन राळेभात, ऋषिकेश बांबरसे,भाजपा तालुका उपाध्यक्ष माजी सरपंच बापूराव ढवळे भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, प्रा संजय राऊत,मनोज कुलकर्णी, पांडुरंग उबाळे,सोमनाथ पाचरणे, पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र ओमासे, गोरख घनवट,संपत राळेभात, मोहन गडदे,मोहन देवकाते,ओबीसी तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे, जमीर बारुद, शिवकुमार डोंगरे, दादासाहेब मोहिते,माजी सरपंच दादासाहेब वारे, माजी सरपंच अशोक राऊत, युवा नेते अजित यादव, राहुल चोरगे, शाहुराव जायभाय, पाटोदाचे सरपंच सदाशिव गवांदे, संतोष राऊत, परशराम राऊत, महादेव जायभाय, गणेश जायभाय, हर्षद शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

error: Content is protected !!