ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

तपनेश्वर जि.प.प्राथ.शाळेत ” शाळा पूर्व तयारी मेळावा” संपन्न

तपनेश्वर जि.प.प्राथ.शाळेत ” शाळा पूर्व तयारी मेळावा” संपन्न

आपल्या पाल्याचा प्रवेश मराठी माध्यमाच्या शाळेतच निश्चित करा केंद्रप्रमुख नवनाथ बडे यांचे आवाहन

जामखेड प्रतिनिधी;-जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढत आहे.शाळा ही मुलांच्या मनातील भीती नसून आपली शाळा ही घरासारखे आहे.व शाळा म्हणजेच घर.बालकांना शाळेत आनंदाने जाता येईल .हाच उद्देश शाळा पूर्वतयारी कार्यक्रमाचा आहे. माता पालक व शिक्षक हे दोन खऱ्या अर्थाने बालकांचे आधारभूत आहेत.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळत आहे. यासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश मराठी माध्यम शाळेतच निश्चित करावा असे आवाहन कार्यक्रम प्रसंगी केंद्रप्रमुख नवनाथ बडे यांनी केले.

जामखेड शहरातील तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी यांची वाजत गाजत फेरी काढण्यात आली. त्यांचे शालेय आवारात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच सर्व नवागतांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. पूर्व तयारी मध्ये विविध पोस्टर, फुगे लावून शाळा परिसर सजविण्यात आला होता. प्रसन्न वातावरणात दाखल विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवेशोत्सव २०२४ संपन्न झाले.कार्यक्रमाचे फित शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष धनराज पवार यांच्या हस्ते कापून केंद्रप्रमुख नवनाथ बडे, मुख्याध्यापक बळीराम अवसरे, दाखल पात्र विद्यार्थ्यांचे आई वडील, शाळेतील शिक्षक वृंद , अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले आणि लक्ष्मीरुपी कुंकवाचा ठसा शाळेतील विद्यार्थ्यांचे पाहिले पाऊल म्हणून दिपाली बाळु जाधव हिचे घेण्यात आले.व त्याचा उत्साह वाढावा म्हणून त्यांना फुगे भेट देण्यात आले.मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या विविध कृती पूर्ण करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले. त्यात शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भाषिक विकास विकसित व्हावे या उद्देशाने स्टॉल लावण्यात आले. मुलांना गोडगोड खाऊ देण्यात आला.सुंदर सेल्फी पॉईंटवर फोटो घेऊन सेल्फीचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक बळीराम अवसरे, शिक्षिका जया चौभारे, सुजाता राक्षे, शितल कदम, सहशिक्षक प्रताप पवार, संजय आरेकर, शुभांगी साळुंके, रूपाली कांबळे, नीता तांबे तसेच विशेष सहकार्य विशेष सहकार्य अंगणवाडी सेविका शुभांगी राऊत,मिना जाधव, कविता परदेशी, रोहिणी चेमटे, जयश्री उदावंत,रेखा पवार, मदतनीस शिवकन्या राजगुरू आदींनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रताप पवार यांनी तर आभार प्रदर्शन संजय आरेकर यांनी मानले.

error: Content is protected !!