ब्रेकिंग न्युज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊत

ज्ञानराधा बॅकेच्या पैसे अडकलेल्या खातेदाराची गेवराईत बैठक; आंदोलन व गुन्हे दाखल करण्याचा निर्णय

ज्ञानराधा बॅकेच्या पैसे अडकलेल्या खातेदाराची गेवराईत बैठक; आंदोलन व गुन्हे दाखल करण्याचा निर्णय

 

गेवराई : येथील ज्ञानराधा बॅकेत तालुक्यातील शेकडो खातेदारांचे पैसे अडकले असुन त्यांना बॅकेचे अध्यक्ष हे नुसते फेसबुक वर येवुन व बोलुन तारीख पे तारीख देत असुन त्यामुळे आता खातेदार हतबल झाले आहेत. या सर्व खातेदारांनी एकत्र येत एका बैठकीचे आयोजन करून यावेळी बोलताना सचिन उबाळे म्हणाले कि बॅकेने २१ मे पर्यंत पैसे दिले नाहीत तर बॅके विरोधात आंदोलन करून सुरेश कुटे यांच्यावर १००० हजार गुन्हे दाखल करणार असा निर्णय या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
ज्ञानराधा बॅकेने जिल्ह्यातील हजारो ठेवीदाराचे पैसे अडकवले असुन त्यामुळे बॅके विरोधात खातेदारांचा रोष निर्माण झाला आहे.यातुनच तालुक्यातील बॅकेच्या खातेदार यांनी एकत्र येत शुक्रवार रोजी रात्री ८ वाजता गेवराई शहारात एक बैठक घेण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातील खातेदारांच्या बाजुने आंदोलन करणारे सचिन उबाळे हे उपस्थित होते.यावेळी खातेदार यांनी बॅकेतुन आमचे पैसे दिले जात नाहीत.यात सुरूवातीला बॅकेच्या वतीने नुसते टोकन दिले मात्र पैसे दिले नाहीत अशा अडचणी माडल्या.यावेळी मार्गदर्शन करतांना सचिन उबाळे यांनी सांगितले की ज्ञानराधा बॅकेचे अध्यक्ष सुरेश कुटे यांनी खातेदाराचे २१ मे पर्यंत पैसे देवुन सहकार्य करावे नसता कुटे यांच्यावर १००० हजार गुन्हे दाखल करणार असल्याचे सचिन उबाळे यांनी बैठकीत बोलताना सांगितले.बैठकी नंतर पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांची भेट घेवुन या विषयी चर्चा केली. या बैठकीला तालुक्यातील शेकडो खातेदार उपस्थित होते.

error: Content is protected !!