ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

तात्यासाहेब मेघारे यांना पी एच .डीप्राप्त

तात्यासाहेब मेघारे यांना पी एच .डीप्राप्त

गेवराई प्रतिनिधी;- धोंडराई गावचे भूमिपुत्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केकतपांगरी येथे कार्यरत असलेले प्राथमिक पदवीधर शिक्षक तात्यासाहेब मेघारे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाने नुकतीच विद्या वाचस्पती ( पीएच .डी ) ही पदवी बहाल केली आहे.

साने गुरूजी विद्याप्रबोधिनी सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र महाविद्यालय खिरोदा तालुका रावेर चे प्रोफेसर डॉ . साहेबराव भुकन सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण शास्त्र या विषयात ” आचार्य रजनीश यांच्या शैक्षणिक विचारांचा अभ्यास ” हा शोध प्रबंध त्यांनी विद्यापीठाला सादर केला होता . श्री मेघारे हे समर्पित भावनेने गेल्या ३३ वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करणारे उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय असे जिल्हा परिषद बीड ने जिल्हा पुरस्कार देऊन गौरवलेले आदर्श व अभ्यासू शिक्षक आहेत . इंग्रजी भाषेचे शिक्षक प्रशिक्षक म्हणून ही श्री मेघारे यांनी उत्कृष्ट कर्तव्य बजावले आहे . शिक्षण ,सहकार , संघटन आदी क्षेत्राबरोबरच वाचन व लेखन याबाबतचा व्यासंग त्यांनी जपला आहे . त्यांच्या या यशाबद्दल माजी आमदार श्री अमरसिंह पंडीत साहेब . माजी शिक्षण सभापती श्री नारायणराव मोटे सर गटशिक्षणाधिकारी श्री सोनवणे साहेब . ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री . प्रविण कुमार काळम पाटील साहेब . धनंजय शिंदे साहेब . विठ्ठल मंदिर संस्थानचे मठाधिपती हभप रामदास महाराज .धोंडराई गावच्या सरपंच श्रीमती .शीतलताई साखरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरतराव खरात ‘सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री नारायणराव नवले . गौरव खरात . शारदा विद्यामंदिर शाळेचे प्राचार्य जगदाळे सर .मुख्याध्यापक व सर्व स्टाफ जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धोंडराई व केकतपांगरी . तसेच गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे आजी माजी संचालक श्री तारुकर सर ‘ सुलाखे सर लोणकर सर कुडके सर सुळे सर सानप सर कवरे सर फुंदे सर खेडकर सर सय्यद जलील सर राजेद्र चौधरी सर बाळराजे तळेकर सर सारंग देशपांडे सर दुधाळ सर नवले सर जंगले सर पंडीत सर पट्टे सर ठाकुर सर जगन्नाथ जाधव सर . लहु चव्हाण सर धर्मराज करपे सर ‘ राजाभाऊ बनसोडे सर मस्के सर हातमोडे सर लगड सर सपाटे सर कोठेकर सर युवराज बेडवाल सर यासहअनेक शिक्षक बंधु भगीनींनी तात्यासाहेब मेघारे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .

error: Content is protected !!