ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित जसपाल नारंग यांचा स्नेह-75 च्यावतीने सत्कार

डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित जसपाल नारंग यांचा स्नेह-75 च्यावतीने सत्कार

मानव सेवेत ईश्वरी सेवेचे व्रत जसपाल नारंग जोपासत आहेत
-प्रमोदकुमार छाजेड

अहमदनगर – स्वत:चा उद्योग, व्यवसाय सांभाळून गेल्या 30 वर्षांपासून सर्वसामान्य लोकांना समाज सेवा म्हणून मोफत होमिओपॅथी उपचार व औषधे देऊन मानव सेवेत, ईश्वरीय सेवेचे व्रत जसपाल नारंग जोपासत आहेत. या सेवेत पत्नी निता नारंग साथ देत आहेत. महाग होत चाललेल्या आरोग्य सेवेत आज सर्वसामान्यांना उपचार घेणे अवघड होत आहे, अशा परिस्थितीत जसपाल नारंग गरजूंना मोठा आधार ठरत आहेत. त्यांच्या हातून अशीच जनसेवा व्हावी, अशी आशा प्रमोदकुमार छाजेड यांनी व्यक्त केली.
सावेडी उपनगरातील प्रोफेसर चौक येथे जसपाल नारंग मोफत होमिओपॅथी उपचार करुन समजसेवा करत असल्याबद्दल त्यांना ‘डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित केल्याबद्दल स्नेह-75 ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निता नारंग, प्रमोदकुमार छाजेड, ईश्वर सुराणा, बाळासाहेब रेणाविकर, नारंग परिवार उपस्थित होता.
जसपाल नारंग सत्कारास उत्तर देतांना म्हणाले, समाजात वावरताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना ठेवून हे आरोग्य सेवेचे काम करत आहे. होमिओपॅथी उपचारामुळे अनेक रुग्णांना चांगला फायदा होत आहे. गेल्या 30 वर्षांपासून आपण ही सेवा करत आहोत. आपल्या कार्याची दाखल एस.एस.ए. युनिर्व्हसिटी पोर्टलॅड,यूएसए द्वारे होमिओपॅथी आणि सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कामाबद्दल ‘डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले याबद्दल स्नेह-75 ने आपला सत्कार करुन या कार्यास प्रोत्साहनच दिले असल्याचे सांगितले.
स्नेह-75 च्या वतीने नारंग यांचा केलेला हा सत्कार आम्ही विसरु शकणार नाही, असाच स्नेह त्यांनी ठेवावा, असे निता नारंग यांनी आभार व्यक्त करतांना म्हणाले.
———-

फोटो – जसपाल नारंग यांना ‘डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित केल्याबद्दल स्नेह-75 ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निता नारंग, प्रमोदकुमार छाजेड, ईश्वर सुराणा, बाळासाहेब रेणाविकर, नारंग परिवार. (छाया : विजय मते)

error: Content is protected !!