ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

जि.प.प्राथ.शाळा पोतेवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जि.प.प्राथ.शाळा पोतेवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जामखेड प्रतिनिधी;-विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून तसेच वार्षिक स्नेहसंमेलन गरजेचे आहे. वार्षिक स्नेहसंमेलन हे केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले.

जामखेड तालुक्यातील पोतेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरवात राजमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केंद्रप्रमुख राजेंद्र त्रिंबके,केशव गायकवाड, सुरेश मोहिते, विक्रम बडे, नवनाथ बडे ,राम निकम, अहमदनगर प्राथमिक शिक्षक बंँक चे संचालक संतोषकुमार राऊत, विकास मंडळाचे विश्वस्त तथा शिक्षक समन्वय समिती चे अध्यक्ष मुकूंदराज सातपुते, जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथ चव्हाण, दक्षिण जिल्हा प्रमुख केशवराज कोल्हे, प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जरांडे,डॉ.बाळासाहेब मुळीक, काकासाहेब कुमटकर, निलेश बोराडे सुनील भामुद्रे ,विजय जेधे, अतुल मुंजाळ, महेंद्र लव्हाळे, अमोल सातपुते, अमोल रासकर, विकास शिंदे, विजय चव्हाण, कानिफनाथ हजारे, बापूसाहेब कोळी आदी शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री गणेशाच्या नृत्याने झाली. यावेळी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यावेळी मुख्याध्यापक रविंद्र तांबे यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला.

या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी शाळा व विद्यार्थी विकासनासाठी प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली – सदिच्छा मंडळाच्या वतीने २१००/- रूपये बक्षीस वितरण गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी स्वच्छ शाळा, सुंदर शाळा या राज्य शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमात शाळेचा जामखेड तालुक्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते मुख्याध्यापक रविंद्र तांबे व सहशिक्षिका मनिषा भोरे यांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसाठी पालकांनीही खिसा रिकामा करत हजारो रुपये बक्षीस दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोजकुमार कांबळे, किरणकुमार माने यांनी केले तर आभार प्रदर्शन रविंद्र तांबे यांनी मानले.

error: Content is protected !!