ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी प्रदिप कोकडवार यांची नियुक्ती

🔸गणेश जाधव/संपादक

संयुक्त राष्ट्रामधे स्थापीत व संलग्न असलेल्या तथा भारत सरकारच्या नीती आयोगाशी जोडून असलेल्या अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जिंतूर येथील माजी नगरसेवक प्रदिप सोपानराव कोकडवार यांची नियुक्ती करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजीक न्याय आयोग हे मानव अधिकाराच्या सुरक्षेसाठी कार्य करण्यात सदैव अग्रेसर राहीले असून यामधे महिलांचे शोषण- उत्पीडन व त्रास, पुरुषांचे उत्पीडन व त्रास, हुंड्यासाठी त्रास, हुंडाबळी, अत्याचार, बलात्कार, महिलांचे हक्क व संरक्षण, बाल हक्क, बाल शोषण, बाल संरक्षण, श्रमिक शोषण, मानवी तस्करी, उपासमार, लुबाडणूक, खोटे आरोप, खोट्या केस मध्ये फसवणे, बेकायदेशीर कृत्य, भ्रष्टाचार, भीती, दहशतवाद, मानवाधिकार व मौलीक अधिकाराचे उल्लंघन, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, पोलीसांद्वारा अत्याचार व त्रासाविरुद्ध संरक्षण अधिकार, दलितांचे अधिकार, कामगारांचे अधिकार, समानतेचा अधिकार व सन्मानाने जगण्याचा अधिकार आदी समाविष्ट असून यांसह सर्व प्रकारच्या सामाजीक अनिष्ट प्रवृत्ती व घटनांच्या विरोधात कार्य करण्यात अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजीक न्याय आयोग सदैव तत्पर व अग्रेसर आहे. प्रदिप कोकडवार यांचे मानव अधिकार क्षेत्रात असलेले सामाजीक कार्य, जनसेवेतील सक्रियता, निस्वार्थी पत्रकारिता, देशभक्ती व राष्ट्रनिष्ठा पाहता पीडित व्यक्तींच्या न्यायहीतांसाठी शासन-प्रशासनाच्या सहकार्य व सहभागाने कार्य तसेच मदत करणे हेतू त्यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजीक न्याय आयोगाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी निवड करणात आली. आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोष बजाज द्वारा त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

error: Content is protected !!