ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

नगर पालिका कर्मचाऱ्यांची पत्रकारासोबत उद्धट वागणूक पत्रकार संघटनांनी नोंदवला निषेध.

नगर पालिका कर्मचाऱ्यांची पत्रकारासोबत उद्धट वागणूक पत्रकार संघटनांनी नोंदवला निषेध.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️महेंद्र कुमार महाजन | रिसोड.
येथील पत्रकार विनोद खडसे यांच्यासोबत नगरपालिका कर्मचार्‍यांनी उद्धट वागणूक देऊन जाणीवपूर्वक वाद घालून पाचशे रुपये दंड आकारला याबद्दल पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवून तहसीलदार रिसोड यांना निवेदन दिले याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील पत्रकार विनोद खडसे हे बँकेला कागदपत्र देण्यासाठी त्यांच्या दुकानांचे शटर अर्धवट उघडून फाईल मधून कागद काढत असता नगरपालिकेचे फिरते पथक तिथे आले व तुम्ही कसे काय दुकान उघडले असा वाद घालून त्यांना पाचशे रुपयांचा दंड आकारला यावेळी खडसे यांनी मार्केट पूर्ण बंद असून मला बँकेला महत्वाची कागदपत्रे देण्यासाठी फाईल मधून मी कागद काढण्यासाठी दुकान उघडली असे सांगून मी पत्रकार आहे हे सांगितल्यानंतर सुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी वाद घालून जाणीवपूर्वक पाचशे रुपयांचा दंड केला वास्तविक शहरात अनेक दुकानदार शटर खाली ठेवून आत गिऱ्हाईक करत असताना सर्व पत्रकार डोळ्यांनी पाहतात याकडे नगरपालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही मार्केट पूर्ण बंद होती कुठे गिऱ्हाईक नव्हतं त्यानंतरही जाणीवपूर्वक पोलिसांना बोलावून दंड करण्याची प्रवृत्ती नगरपालिका कर्मचारी यांनी दाखविली या घटनेचा पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवला व संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निवेदन तहसीलदार रिसोड यांना दिले कोरोणाचे संकट अधिक असताना पत्रकार लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून पेपरसाठी वृत्तसंकलन करतात त्यासोबतच कोरणा च्या लढ्यात पत्रकार कोरोणा योध्दा म्हणून सुद्धा सहभागी असतात त्यांनाच असी उद्धट वागणूक दिल्याने पत्रकारांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे याबाबत पत्रकारांना पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, तसेच महसूल प्रशासनाने सहकार्य करण्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी रिसोड तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!