ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

घोटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

घोटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

🔸अशोक काळकुटे | संपादक

स्वाभिमानीचे नेते व माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर , यांच्या वाढदिवसानिमित्त घोटा येथे सॅनिटायझरची फवारणी.

▪️दिपक मापारी | रिसोड.
तालुक्यातील घोटा येथे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १३ मे रोजी निर्जुतुकीकरण करण्यात आले. ग्रामीण भागातील कोरोनाचा स्फोट होत असून, नागरिक भयभीत झाल्याचे दिसून येते. घोटा येथेही कोरोना चे काही रुग्ण आढळून आले. प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून निर्जुतुकीकरण करण्यात आले. गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता घोटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष बालाजी मोरे पाटील, ने पुढाकार घेऊन नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा. असे आव्हान प्रत्येकाला केले आहे. गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी व कोरोना विषाणूचा धोका कमी होण्यासाठी ग्रामीण भागात निर्जुतुकीकरण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्या अनुषंगाने घोटा येथे ही निर्जुतुकीकरण व सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. करण्यात आले. ग्रामस्थांनी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी विनाकारण गर्दी करु नये. मास्काचा वापर करावा. हात स्वच्छ धुवावेत आदी नियमाचे पालन करण्याचे आव्हान.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी राज्यमंत्री रविकांतभाऊ तुपकर ,, यांच्या वाढदिवसानिमित्त १३ मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष बालाजी मोरे पाटील, यांनी घोटा गावांमध्ये सॅनिटायझरची व जंतुनाशकची फवारणी केली .
यावेळी जिल्हाअध्यक्ष बालाजी मोरे पाटील, दिपक मापारी मामा,, विक्रम पाटील,, गणेश लोखंडे,, गणेश गवळी, अमोल शेंडगे,, सचिन मोरे पाटील, समस्त गावकरी मंडळी घोटा उपस्थिती होती.

error: Content is protected !!