ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

पुरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पुरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सातारा | राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यात अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. सातारा जिल्ह्यातील मोरगिरी, आंबेघर, हुंबरळी तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उद्या बुधवार दि.२८ जुलै रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

सातारा जिल्ह्यात महापुराचा वेढा पडला असून बाजारपेठ, एसटी स्टँडसह शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. संध्या पुराचे पाणी ओसरले असून आता सर्वत्र चिखल झाला आहे. अनेक भागात दरड कोसळली असुन अनेक जण दगावले आहे. विरोधी पक्षनेते पुरग्रस्त नुकसानीचा व तेथील परिस्थीतीचा आढावा घेण्याकरीता सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

दौऱ्याची सुरूवात मोरगिरी, आंबेघर तालुक्यातील पाटण गावापासुन होणार आहे. पाटण गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी दुपारी २.४५ वाजता करणार आहेत. मोरगिरी, आंबेघर तालुक्यातुन कोयनानगर येथील प्रथमिक केंद्र शाळा येथे स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांची संध्याकाळी ४.३० वाजता भेट घेणार आहेत. त्याचबरोबर हुंबरळी तालुक्यातील पाटण गावामधील अतिवृष्टीग्रस्त भागाची संध्याकाळी ५.१५ वाजता पाहणी करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!