ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

आर. आर. पाटील हे खाकी वर्दीतील देवमाणूस : कृष्णप्रकाश यांचे गौरवोद्गार

अंजनी गावात भव्य नागरी सत्कार

🔸गणेश जाधव|संपादक

       माजी गृहमंत्री आर. आर. आर. पाटील यांचे बंधू आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेले पोलिस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांच्या अंगी प्रचंड विनम्रता आहे. ३२ वर्षांच्या नोकरी कालावधीत शब्दापेक्षा आर. आर. पाटील यांचे कामच जास्त बोलायचे. पोलिस खात्यात असून सरळमार्गी काम करणारे आर. आर. पाटील खाकी वर्दीतील देवमाणूस होते. असे गौरवोद्गार पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी अंजनी (ता तासगाव) येथे काढले.माजी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू आर. आर. पाटील हे गुरुवारी पोलिस उपअधिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. या निमीत्त जन्मगावी अंजनी येथे काल भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश बोलत होते.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत अंजनी, आर. आर. (आबा) पाटील विकास सोसायटी अंजनी, राजाराम (तात्या) रामराव पाटील गौरव समितीच्या वतीने करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार सुमन पाटील होत्या.पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, आर. आर. पाटील यांनी अखंड नोकरीकाळात आपण गृहमंत्र्यांचा भाऊ आहे ही बाब कुणाला सांगितली नाही. ही गोष्ट वरिष्ठ पोलिस अधिका-यांना अनेक वेळा इतरांकडून कळायची. त्यांनी जिथे जिथे काम केले तिथे शांतपणाने नोकरी केली. भाऊ गृहमंत्री असताना सुध्दा आर. आर. पाटील यांनी साईड ब्रॅन्चमध्ये काम केले.आर. आर पाटील हे नम्र अधिकारी असले तरी गुन्हेगारासाठी कर्दनकाळच होते. त्यांच्या या कार्याबद्दल दोन वेळेस राष्ट्रपती पदकाने तर एक वेळेस महासंचालकांच्या पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांचे हे योगदान पोलिस खाते विसरणार नाही.आर. आर. पाटील म्हणाले नोकरीच्या पहिल्या दिवसापासून सेवानिवृत्तीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या भागातून पोलिस आणि माझ्यावर प्रेम करणारे लोक आज कार्यक्रमास आले आहेत ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. अंजनी गावाने आमच्या कुटूंबावर फार मोठे उपकार केले आहेत. यामुळे आम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकलो. गावाने आमचे कुटूंब हे तळहातावरील फोडाप्रमाणेच जपलेले आहे. हे उपकार आणि ॠण आम्ही कधीच फेडू शकणार नाही.कोल्हापूरचे पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, आर. आर. पाटील यांचा  आणि माझा सहवास फार कमी आहे. परंतू ते स्वत:च्या कर्तृत्वाने माठे झालेले व्यक्तिमत्व आहे. न थकता आणि न दमता अविरतपणे काम करणारा त्यांच्यासारखा दुसरा अधिकारी आजपर्यंतच्या सेवेत बघितला नाही.आर.आर. पाटील यांचे सुपुत्र राहूल पाटील, उत्तम पाटील, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत,  यांनी मनोगते व्यक्त केली.सुरेश पाटील आणि माणिक पाटील यांनी स्वागत आणि प्रास्तविक केले.सांगलीचे पोलिस अधिक्षक दिक्षीत गेडाम, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार रविंद्र रांजणे, अंजनीच्या सरपंच स्वाती जयसिंग पाटील, आर. आर. पाटील यांच्या मातोश्री भागिरथी पाटील, बंधू सुरेश पाटील, पत्नी कुंजलता पाटील, स्मिता पाटील, यांसह पोलिस विभागातील अधिकारी, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर आणि प्रशासकीय, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!