ब्रेकिंग न्युज
लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळे

पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी साधला पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा

 

सांगली भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पडळकर आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये शाब्दिक युद्ध पेटलेले दिसून येणार आहे. सांगली जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्यात किती पैसे खर्च झाले याची अद्याप ही माहिती दिली गेली नाही. तसेच बैठकीत एका आमदाराला एक, एका आमदाराला एक न्याय का असे विचारले असता. तर आम्ही बघतो पाहतो असे उत्तर पालकमंत्री देतात. खरं तर पालकमंत्री जयंत पाटील यांना सत्तेचा माज आणि मस्ती असल्याने ते नीट उत्तर देत नाहीत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते सांगली मध्ये जिल्हाधिकारी कार्यलय येथे बैठकी नंतर बोलत होते.

शुक्रवारी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यलयात जिल्हा नियोजन बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार आमदार शासकीय अधिकारी उपस्थित होते. महाआघाडीच्या नेत्यांना, आमदारांना विकास कामांसाठी जास्त पैसे दिले जात आहेत. मात्र, आम्हाला कमी दिले जातात, असं गोपीचंद पडळकर कडाडले. निधी देण्यात भेदभाव होत असल्याचा आरोप करत बैठकीतून पडळकर बाहेर निघून आले. पालकमंत्री आणि या मिटिंगचा गोपीचंद पडळकर यांनी निषेध केला आहे. जयंत पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी सर्वाना समान न्याय द्यायला हवा होता, असं पडळकर म्हणाले.

आयकर छाप्यांवरुन अजित पवार काय म्हणतात याला महत्व नाही. आता आमच्याकडे एजन्सी का छापा टाकत नाहीत. एजन्सीकडे काही कागदपत्रे असतील त्यामुळे छापा टाकला असेल, असा टोला पवार यांना पडळकर यांनी लगावला.

error: Content is protected !!