ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाबळेश्वर येथे ‘चेतना नव्या युगाची, नव्या विचारांची, प्रगतीशील महाराष्ट्राची’ या दोन दिवसीय केडर कॅम्प आयोजित करण्यात आले आहे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाबळेश्वर येथे ‘चेतना नव्या युगाची, नव्या विचारांची, प्रगतीशील महाराष्ट्राची’ या दोन दिवसीय केडर कॅम्प आयोजित करण्यात आले आह! या केडर कॅम्प ला मार्गदर्शन करण्यासाठी पहिल्या सत्रात खा. श्रीनिवास पाटील साहेब यांनी ‘महाराष्ट्राची जडणघडण व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब’ यांच्याबद्दल युवकांना मार्गदर्शन केले. तसेच श्री.हरी नरके साहेब यांनी आरक्षण व वास्तव या विषयावर युवकांना विस्तृत असे मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात श्री.रामराजे निंबाळकर साहेब यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक न्याय मंत्री श्री.धनंजय मुंडे साहेब यांनी ‘युवा संवादातून युवा संघटन’ या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री.जयंत पाटील साहेब यांनी ‘पक्ष संघटना हेच साधन व साध्य’ या विषयावर युवकांशी मार्गदर्शन करत संवाद साधला.

राज्याचे आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे साहेब यांनी ‘जनतेशी जपा नाळ हाच कार्यकर्त्यांचा भविष्य काळ’ यावर मार्गदर्शन केले! तसेच आदरणीय संसदरत्न सुप्रिया ताई सुळे यांनी ‘सत्ता कश्यासाठी’ या विषयावर मार्गदर्शन करत संवाद साधला. या वेळी सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष हे पदाधिकारी केडर कॅम्प ला उपस्थित होते.

 

error: Content is protected !!