ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

एक दिवसीय निसर्ग शाळा

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा: “आयुर्वेदिक स्टडी सर्कल यवतमाळ”द्वारा”एक दिवसाची निसर्ग शाळा हा नावीनपूर्ण उपक्रम गायत्री फॉर्म हाऊस अर्जुना येथील निसर्गरम्य वातावरणात घेण्यात आला प्रत्येकाने आठवड्यातील एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालविला पाहिजे बदलती जीवनशैली आणि वातावरण यामुळे मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्यात या सर्व समस्या वरील उपाय हा निसर्गा कडेच आहे म्हणून प्रत्येकाने निसर्गाला शरण गेले पाहिजे. तसेच रसायनमुक्त जीवन आणि पर्यावरण संवर्धनाकरिता प्रत्येकाने प्रयत्नशील होणे ही काळाची गरज आहे असे विचार आपले स्वास्थ आणि निसर्ग या विषयावर बोलताना प्रा. नरेंद्र ढोकणे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री एकनाथराव बिजवे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सारिकाताई ताजणे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस (महिला), दिनेश भाऊ जयस्वाल, मनीषा काटे, सारंग भदुरकर, मायाताई चव्हाण, डॉ. मदन वरघट हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वैशाली राठोड, पल्लवी कुलरकार, रंजना गोडबोले, आकांशा जाधव यांनी “हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे”या सामूहिक प्रार्थनेच्या गायनाने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वाघमारे यांनी केले तर संचालन योगिता नेवारे यांनी व आभार प्रदर्शन चारुशीला जगताप यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मंगेश नेवारे, रूपाली शिंदे, सलमा शेख, गजु भाऊ चन्ने, अंकुश चव्हाण, गजानन काळे, प्रेमचंद दुधे, दत्ता भाऊ चौधरी, संगीता घनकर, आशिष भोयर, देवाशीष आडे, वैभव शेंडे यांनी केली.

error: Content is protected !!