ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

धक्कादायक_साताऱ्यात गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला सरपंचाने केली बेदम मारहाण ; पोलिसात तक्रार.

धक्कादायक_साताऱ्यात गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला सरपंचाने केली बेदम मारहाण ; पोलिसात तक्रार.

🔸अशोक काळकुटे | संपादक

-विशेष प्रतिनिधी.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वनरक्षक पती-पत्नी साताऱ्यात पळसवडे येथे कार्यरत आहेत.
दरम्यान गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला ३ महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या आहेत. तर डोक्यात दगड घातल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या अशी माहिती मिळत आहे.
मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या अशी विचारणा करून वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वन रक्षक सानप यांना मारहाण केली आहे.
मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सर्वच स्तरातून आरोपी सरपंच आणि त्याच्या पत्नीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

error: Content is protected !!