ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेच्या विहिरीचे बिल काढण्यासाठी 6 हजाराची लाच घेताना जाफराबादचा तालुका कृषी अधिकारी जेरबंद

जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी

आरोपीचे नाव प्रदिप महादेव जाधव वय 57 वर्ष कृषी अधिकारी पंचायत समिती जाफराबाद वर्ग-2

🔸गणेश जाधव/जालना
तक्रारदार यांची बहिण परगावी राहण्यास असल्याने त्यांच्या शेत जमिनीचे संपूर्ण काम तक्रारदार पहात आहेत.तक्रारदार यांच्या बहिणीच्या नावे मौजे गाडेगव्हाण गावच्या हद्दीमध्ये असलेल्या शेत जमिन गट क्रमांक 75 मध्ये जिल्हा परिषद जालना यांच्या मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत नवीन विहीर बांधकाम करिता शासनातर्फे 2,50000/-रुपये अनुदान देण्यात आले.तक्रारदार यांच्या बहिणीच्या शेतामध्ये विहिर खोदकाम करून सदर बांधकाम बाबतचे दोन लाख रुपये बिल यापूर्वी काढण्यात आले होते.सदर विहिरीवरती कठाडे बांधण्याबाबत शासनातर्फे 50 हजार रुपये चे बिल येणे बाकी होते.आलोसे यांनी तक्रारदाराकडे विहिर खोदकाम करण्यासाठी यापूर्वी काढलेले दोन लाख रुपये बिलाचे व सध्या सदर विहिरीचे कठडे बांधकामाचे 50 हजार रुपयांचे बिल काढून देणे या दोन्ही कामासाठीचे दहा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 6,000/-रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करून पंचायत समिती कार्यालय जाफराबाद येथे 6,000/-रुपये लाच स्वीकारताना पंचा समक्ष रंगेहात पकडण्यात आले.आलोसे यांच्या वरती गुन्हा नोंद करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे.सापळा अधिकारी व तपास अधिकारी श्री. शंकर म.मुटेकर पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.जालना.मार्गदर्शक मा.डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,मा.श्री.विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक,मा.श्री सुदाम पाचोरकर पोलीस उप अधीक्षक सापळा पथक-पोलीस अमंलदार गजानन घायवट, गजानन कांबळे,गणेश भुजाडे,मनोहर खंडागळे,प्रवीण खंदारे

error: Content is protected !!