ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

🔸गणेश जाधव/जालना
घनसावंगी तालुक्यातील रामसगांव येथील जुगार अड्ड्यावर गोंदी पोलिसांनी छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ८ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई बुधवारी (दि.०३) रामसगाव येथे करण्यात आली आहे.पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ०२ जणांविरुद्ध पोलीस जमादार नारायण माळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रामसगाव गावाच्या बाहेरील रिकाम्या प्लॉटिंग मध्ये चिंचाच्या झाडाखाली अवैधरित्य जुगार खेळला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती त्यानुसार पथक तयार करून जुगार अड्ड्यावर छापा टाकला.त्यावेळी जुगार खेळताना इसम आढळून व इतर काही जण तिथून पळून गेले आहेत.पोलिसांनी या कारवाईत १ हजार २७० रुपयांची रोख रक्कम,२२ हजार रुपयांचे मोबाईल,६ लाख ८५ हजार रुपये किमतीचे ९ दुचाकी आणि जुगार साहित्य असा एकूण ७ लाख ०८ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके,दिलीप लांडगे,शिंदे यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे

error: Content is protected !!