ब्रेकिंग न्युज
लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळे

मौजे भोगांव ता.उत्तर सोलापूर येथील गोडाऊन तोडुन घरफोडीच्या गुन्हयात 2 आरोपी जेरबंद

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

 

सोलापूर तालुका, पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरणाची कामगिरी

12 पोती हरभरा (चना) व 8 पोती गहु असा एकूण 30,800 /-रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

शासकीय अंगणवाडीस शालेय पोषण आहार प्रकल्पा अंतर्गत पुरविण्यात येणारे अन्नधान्य व कडधान्य हे मौजे भोगाव ता. उत्तर सोलापूर येथील गोडाऊन मध्ये ठेवले होते. सदरचे बंद असलेले गोडाऊन दिनांक 23.7.2022 रोजी सायंकाळी 5.00 वा. ते दिनांक 24.07.2022 रोजी दुपारी 04.00 वा. सुमारास अज्ञात चोरटयाने तोडुन आत मध्ये प्रवेश करून गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेले 16 पोती साखर, 18 पोती बालक गहु, 9 पोती महिला गहु, 15 महिला चना व 14 पोती महिला मुगदाळ असा एकूण 80,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला म्हणून वैभव भगवान देवकर (वय 26 व्यवसाय ठेकेदार रा. टणु पोस्ट बीके ता. इंदापुर जि.पुणे) यांनी सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस दिलेल्या फिर्यादी वरून भांदवि कलम 454,457,380 प्रमाणे दिनांक 26.07.2022 रोजी गुन्हा झाला आहे.
सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचे शोधार्थ सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अंमलदार हे मागावर होते. दरम्यान सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोनि / नामदेव शिंदे यांना सदरचा गुन्हा हा ज्या अज्ञात आरोपी यांनी केला आहे त्याची माहिती त्यांना त्यांचे गोपनिय बातमीदार करवी मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांनी गुन्हे (डी.बी.) पोलीस अंमलदार यांना सांगुन त्यांना मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात 2 आरोपी यांचा शोध घेऊन त्याचेकडे विचारपूस करून तपास केला असता त्या दोघांनी सुरुवातीस उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यानंतर त्या दोघांना अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्या दोघांनी त्याचे इतर 2 साथीदार यांचेसह घरफोडीचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे.
त्या दोघांना गुन्हयाचे तपासकामी दिनांक 22.08.2022 रोजी अटक करून त्या दोघांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सोलापूर यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयांनी दिनांक 26.08.2022 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली होती.
सदर पोलीस कस्टडी रिमांड या दोघाकडुन गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी 12 पोती हरभरा (चना) व 8. पोती गहु असा एकूण 30,800/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस हवालदार संजय देवकर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी नामदेव शिंदे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणातील श्रेणी पोलीस उप-निरीक्षक सुनिल बनसोडे, पोहवा/ संजय देवकर, पोलीस नाईक शशिकांत कोळेकर, पोलीस अंमलदार देवा सोलंकर व पैंगबर बदाफ यांनी बजावली आहे.

error: Content is protected !!