ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

4 लाख 65 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त,एकास अटक. . .

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

मौजे कारंबा ता. उत्तर सोलापुर जि. सोलापूर येथे एका इसमाने त्याचे राहते घरी महाराष्ट्र शासनाची बंदी असलेला गुटख्याचा साठा केलेला आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाली, त्या अनुषंगाने पोनि सर्जेराव पाटील यांनी बातमी प्रमाणे कारवाई करणेकरीता पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथकास आदेशीत केले होते. त्यानुसार पोसई शैलेश खेडकर व त्यांचे पथक हे अन्न व प्रशासन अधिकारी यांचे समवेत मौजे कारंबा, ता. उ. सोलापुर येथे जाऊन खात्री केली असता, एका घरात एकुण 4,65,600 रु. किंमतीचा महाराष्ट्र शासनाची बंदी असलेला अवैध गुटखा साठा मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असून गुन्हयाचे पुढील तपास कामी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.आरोपी- अमीर हारून शेख , रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर बाबत प्रशांत कुचेकर, अन्न व औषध प्रशासन अधिकारी सोलापुर यांनी दिलेल्या तक्रारी नुसार सोलापुर तालुका पोलीस ठाणे गुरनं 1005/2021, भा.द.वि. कलम 328, 188,272,273 अन्न सुरक्षा व मानके का. कलम 2006 चे 26 (2) (iv), 27 (3) (9), 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

error: Content is protected !!