ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड मोठ्या उत्साहात  शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा साजरा…

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड मोठ्या उत्साहात  शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा साजरा…
कोकण संपादक / भरत सरपरे
रायगड जिल्हा प्रतिनिधी / भुषण शिसोदे
मराठा सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर , संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे , महासचिव सौरभदादा खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष सुहासजी राणे  यांच्या सूचनेनुसार
अखिल भारतीय शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा समिती रायगड व संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या वतीने दि.24 सप्टेंबर 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्त राज्याभिषेक सोहळा मोठया थाटामाटात तसेच ढोलताशांच्या गजरात साजरा करण्यात आला.
शिवाजी महाराजांच्या मेघडंबरितील पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच जिजाऊ वंदना व शिव गारद, स्फूर्ती गिते  अशा अनेक कार्यक्रमांनी किल्ले रायगड दुमदुमून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शाक्त राज्याभिषेक सोहळ्याला 2007 पासून मराठा सेवा संघाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष शिवकुमार सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई मोरे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष स्वप्नीलजी म्हात्रे साहेब यांनी प्रथम सुरुवात केली होती, त्याला आज 16 वर्ष पूर्ण होत आहेत.
या कार्यक्रमास मराठा सेवा संघांचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चांदीवडे संभाजी ब्रिगेड कोकण अध्यक्ष सूर्यकांत भोसले,मार्गदर्शक स्वप्नील म्हात्रे, कोकण कार्याध्यक्ष भूषण सिसोदे, अविनाश पाटील,आकाश कांबळे,उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष परमानंद जांभळे, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष विक्रम वाठोरे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव शेडगे, उरण तालुका अध्यक्ष जितेश पाटील, पनवेल अध्यक्ष चेतन मुंडकर युवानेते समीर म्हात्रे आदींसहा अनेक तालुका अध्यक्ष, शाखाप्रमुख व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!