ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अजित पवारांना आता सत्तेची स्वप्ने पडायला लागली

 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “अजित पवारांना आता सत्तेची स्वप्ने पडायला लागली आहे. अडीच वर्षे महाराष्ट्रामध्ये मोगलशाही आणि एकतर्फी सरकार चालवले. त्यामुळे आता ते कधीच सत्तेत येणार नाहीत. अशी परिस्थिती आहे.” असा खोचक टोला बावनकुळे यांनी अजित पवारांना लगावला.

रविवारी साताऱ्यात झालेल्या एका सभेत बोलताना अजित पवार यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. “अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडू नये. आम्ही कधी सत्तेत येऊ तुम्हाला कळणारही नाही.” असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. तसेच, “आम्ही सत्तेत असताना आमच्या हातात सर्व संस्था होत्या; परंतु आम्ही कधी सत्तेचा माज दाखवला नाही.

पुढे बोलताना ते बोलले की, आज राज्यात जे काही चालले आहे, ते गंभीर आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना इतकेच सांगतो की, कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. सत्तेत असणाऱ्यांच्या सांगण्यावरून कोणालाही त्रास देऊ नका. आम्ही सत्तेत कधी येऊ, हे तुम्हाला कळणार नाही.” असा इशारा अजित पवार यांनी दिला होता.

error: Content is protected !!