ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पोलिसांची थट्टा, पोलीस कर्मचारी रिवॉर्ड यादी चर्चेत.

पुणे : पुणे पोलिसांची रिवॉर्ड यादी चर्चेचा विषय बनली आहे. पोलिस उपायुक्तांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 21 हजारांचं बक्षीस आणि गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलिसांना फक्त 100 रुपयाचं बक्षीस जाहीर झाल्याने ही यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुणे पोलिसांच्या उत्तम कामगिरीसाठी पोलिस आयुक्तांकडून देण्यात येणारे रिवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत. उत्तम कामगिरीसाठी हे रिवॉर्ड देण्यात येतात. मात्र सध्या परिमंडळ 3 च्या आयुक्तांनी दिलेल्या रिवॉर्डची एक वादग्रस्त यादी सोशल मिडीया व्हायरल झाली आहे. या यादीमुळे पोलिसांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.पोलिस उपायुक्तांच्या वाहन चालकाला 21 हजार रुपयांचं रिवॉर्ड जाहीर करण्यात आलं आहे. तर गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलिसांना फक्त 100 रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. पुणे पोलिस आयुक्तालयात 8 तारखेला ही जाहीर झाली. यात प्रत्येक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने आपल्या परिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव म्हणून त्यांना रिवॉर्ड अर्थात बक्षीस जाहीर केलं आहे. या यादीत बक्षीसाची रक्कम, कामगिरी आणि नावं आहेत. मात्र ही यादी बक्षिसाच्या रकमेवरुन वादग्रस्त ठरत आहे.
उपायुक्तांच्या ड्रायव्हरला 21 हजारांचं बक्षीस
मात्र यंदाच्या गॅझेट लिस्टमध्ये परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे ड्रायव्हर आणि गार्ड म्हणून नियुक्त असलेल्या चार पोलिस शिपायांना तब्बल 21 हजार रूपये प्रत्येकी इतके रिवॉर्ड देण्यात आले आहेत. गायकवाड यांना वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहचवण्यासाठी त्यांना हा रिवार्ड जाहीर करण्यात आला आहे. एकीकडे परिमंडळ तीनच्या उपायुक्त मीटींगला वेळेवर पोहोचवल म्हणून हजारो रूपयाची बक्षीसांची खैरात करत आहेत. मात्र गंभीर गुन्ह्यामधले गुन्हेगार जीवावर उदार होऊन पकडून आणणाऱ्यांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 100 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे
जीवावर बेतून गुन्ह्याचा छडा लावायची किंमत फक्त 100 रुपये पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मोठ्या टोळ्यादेखील सक्रिय आहे. या टोळ्यांना आळा घालण्यासाठी पुण्यातील गुन्हे शाखेचे प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जीवापार प्रयत्न करत आहे. अनेकदा माहिती मिळाल्यावर रात्रीबेरात्री गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी रवाना होतात. तर अनेकदा तातडीने सापळा रचून गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश मिळवतात. चोरी, खून, अपहरण या प्रकरणातील कोयते, चाकू सुरी यांचा शोध घेण्यासाठी जीवावर बेतून कार्यरत असतात. याच पोलिस कर्मचाऱ्यांना मात्र बक्षिस म्हणून मात्र 100 रुपये जाहीर करण्यात आले आहे.

error: Content is protected !!