ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

संभाजी ब्रिगेड उरण कडून ० ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले आहे… मा. ना. श्री. एकनाथराव शिंदे साहेब, मंत्रालय, मुंबई 32मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

संभाजी ब्रिगेड उरण कडून ० ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले आहे… मा. ना. श्री. एकनाथराव शिंदे साहेब, मंत्रालय, मुंबई 32मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

 

कोकण संपादक / भरत सरपरे

 

मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड,
अँड.इजि. शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब व अँड. शिवश्री मनोजदादा आखरे यांच्या आदेशा नुसार,
आज दि. 14 आँक्टोंबर 2022 रोजी,
रायगड जिल्ह्या – महासचिव – शिवश्री समीर म्हात्रेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,

राज्यातील ० ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही त्वरित थांबविण्याबाबत…. संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र.३७ टी.एन.टी. १ दि. २१ सप्टेंबर २०२२ मार्फत :- मा. तहसीलदार उरण

उपरोक्त विषयान्वये कोव्हिड 19 संसर्गजन्य आजाराचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्यासाठी घातलेली पदभरती बंदीबाबतचे पत्र मा. आयुक्त (शिक्षण) आणि मा. शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांना निर्गमित केले आहे. सदर पत्रातील मुद्दा क्र. ४ नुसार ० ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

जे महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन समोर मांडले होते. व छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात त्याची अंमलबजावणी केली होती. तेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून मांडले असून RTE आँक्ट 2009 नुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काची तरतूद आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात वस्ती तेथे शाळा हे धोरण शासनाने अवलंबले आहे. त्यानुसार वस्ती, पाडे, तांडे, वाड्या अशा दुर्गम भागात शाळा सुरु करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे निश्चितच शाळाबाह्य विद्यार्थी प्रमाण कमी झाले आहे. कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचे प्रमाण अतिशय दुर्गम तसेच वाडी, वस्ती, तांडे व आदिवासी बहुल क्षेत्रात अधिक आहे.

या शाळा बंद झाल्यास तेथील मुलांच्या व विशेषतः मुलींच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते कायमचे शिक्षण प्रवाहापासून दूर लोटले जातील करण काही आदिवासी भागात पक्के रस्ते नाहीत. गाव, वस्तीच्या बाजूला नद्या, नाले असल्यामुळे पावसाळ्यात या भागाचा अनेक दिवस संपर्क तुटतो. कुठलेही दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे या बाबीचा गांभिर्याने विचार करावा. विद्यार्थीसंख्येअभावी कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये. तसेच, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षकभरती करावी, शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून टाकावीत, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. यासारख्या उपाययोजना करण्यात याव्यात ही विनंती करण्यात येत आहे.

कार्यवाही त्वरित थांबवन्याबाबत यावी.
उरण -रायगड तहसिलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
उरण तालुका अध्यक्ष -शिवश्री जितेश पाटिलसाहेब
पनवेल तालुका महानगर अध्यक्ष – शिवश्री चेतन मुंडकरसाहेब,
उरण तालुका उपाध्यक्ष -शिवश्री चंदन कडूसाहेब,
उरण तालुका महासचिव – शिवश्री साहिल कडू साहेब
उरण तालुका संघटक -शिवश्री अमोल पाटीलसाहेब
शिवश्री भावेश शेळकेसाहेब व इतर कार्यकते व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!