ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

श्री क्षेत्र नारायणगडाच्या सर्वांगिण विकासासाठी 23 कोटींचा निधी वर्ग करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना मागविला अहवाल.

श्री क्षेत्र नारायणगडाच्या सर्वांगिण विकासासाठी 23 कोटींचा निधी वर्ग करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना मागविला अहवाल.

जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या प्रयत्नाला आले यश

बीड प्रतिनिधी ;-बीड जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान,धाकटी पंढरी अशी ख्याती असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडावरील विकास कामांसाठी बाळासाहेबांची शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कडे 23 कोटी रु.निधी वर्ग करण्याची मागणी केली होती. जिल्हाप्रमुख खांडे यांच्या प्रयत्नाला यश आले असून मुख्यमंत्री शिंदे यांनी सदरील निधी वर्ग करण्याचे आदेश दिले आहे.या निधीतून लवकरच श्री क्षेत्र नारायणगडाच्या सर्वांगिण विकासाला प्रारंभ होणार आहे.
गुरुवार दि.20 ऑक्टोबर रोजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मुंबई येथे  बाळासाहेबांची शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री  एकनाथराव शिंदे यांची भेट घेवून श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकास कामासंदर्भात निवेदन सादर केले होते.  फेब्रुवारी 2018 मध्ये श्री क्षेत्र नारायणगड येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील एकूर 17 कामांसाठी 25 कोटी रु.निधी मंजुर झाला होता. प्रशासकिय मान्यतेमध्ये आदेशित केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी बीड यांनी प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घेण्या बाबतचे आदेशित केले होते. त्यानुसार श्री क्षेत्र नारायणगड येथे भक्त निवास बांधकाम,चार कक्षांचे विश्रामगृह, पाणी व्यवस्था आदिसह विविध विकास कामे करण्यात येणार होती. 25 कोटी रु.निधीपैकी 2 कोटी रु.निदी प्राप्त झाला होता. उर्वरीत विकास कामांसाठी आवश्यक असणारा 23 कोटी रु.निधी प्राप्त झालेल नव्हता. बीड जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात श्री क्षेत्र नारायणगडाचे भक्त आहेत. या तीर्थक्षेत्रावर विकासकामे होणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना दिली. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी त्वरीत या कामासाठी विकास निधी देणार असल्याचे सांगितले आहे. या अनुषंगाने बीडचे जिल्हाधिकारी यांना ग्रामविकास प्रधानसचिव यांनी  पत्र पाठवून श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकास कामांचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कुंडलिक खांडे यांच्या प्रयत्नामुळे  श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकासाला आता गती मिळणार असल्याचे दिसते.

error: Content is protected !!