ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

खेड तालुक्यातील कहू येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्यूमुखी

खेड तालुक्यातील कहू येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्यूमुखी
9 डिसेंबर 2022
राजगुरूनगर : गाव कहू (चासकमान) ता. खेड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक गाय मृत्यूमुखी पडली आहे. सकाळी पहाटे सदर गाय इतर गाईबरोबर कहू येथील डोंगरावर चरत असताना बिबट्याने अचानक येउन हल्ला केला व गाईला ओढत जवळच्या झूडपात घेऊन गेला. यात गाईचा मृत्यू झाला आहे. धरण क्षेत्रातील घनदाट जंगल असल्याने गाईचा शोध घेण्यास स्थानिकांना अडचणी येत होत्या. सदर गाय ही स्थानिक शेतकरी बाळासाहेब दाते यांच्या मालकीची असून यामुळे त्यांचे पन्नास ते साठ हजारांचे नुकसान झाले. वनविभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली असून इतर शेतकरी व ग्रामस्थ यांना सुरक्षितता बाळगण्या संबंधी सूचना देण्यात आल्याचे पोलीस पाटील अनिल दाते व सरपंच सुरेश केदारी यांनी सांगितले. गावचे उपसरपंच ऍड. संतोष दाते यांनी वनविभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.लवकरात लवकर वन क्षेत्राची तपासणी करून बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रतिनिधी : विनायक जठार

error: Content is protected !!