ब्रेकिंग न्युज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊत

चिखलगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

राजगुरुनगर खेड तालुक्याचे पश्चिम भागातील चिखलगाव येथे आज पासून अखंड हरिनाम सप्ताहजय जय राम कृष्ण हरी” चे नामघोषात , टाळ मृदंगाच्या मंजूळ स्वरात, भक्तीमय, आनंदाच्या वातावरणात प्रारंभ झाला. आज रविवार सकाळी ठीक दहा वाजता मोहकलकर दिंडी क्रमांक १०१ पितळी विण्याचे मालक ह. भ. प. माधव महाराज रणपिसे यांच्या हस्ते कलश पूजन आणि खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव व आडगाव विकास सोसायटीचे संचालक श्री सतीश चा॓भारे पाटील यांच्या हस्ते विणा पूजन करण्यात आले. यावेळी ह. भ. प. नामदेव महाराज गोपाळे , ह. भ. प. निवृत्ती महाराज मुके, ह. भ. प. बाळासाहेब शिंदे, मृदुंगमणी कुमार हर्षल हनुमंत गोपाळे, लक्ष्मणराव मुके , ज्ञानदेव महाराज गुरव , सुरेश गायकवाड , दत्तात्रय सूर्यवंशी , हनुमंत गोपाळे , बाळशिराम गोपाळे , सुरेश गोपाळे, दिनकर गायकवाड आदी ग्रामस्थ व वारकरी उपस्थित होते. वैकुंठवासी गुरुवर्य ह. भ. प. मारुती बाबा गुरव, वैकुंठवासी ह. भ. प. भिकाजी बाबा वाजवणे , वैकु॓ठवासी ह. भ. प. भागोजी बाबा मुके, वैकुंठवासी लक्ष्मण राणोजी गोपाळे यांच्या कृपा आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह सन १९५४ पासून साजरा होत आलेला असून या सप्ताहाचे  ६९ वे वर्ष  आहे. या सप्ताह मध्ये ह.भ.प.पोपट महाराज राक्षे, अनिल महाराज चव्हाण , प्रकाश महाराज साठे , नेताजी महाराज चव्हाण, ज्ञानेश्वर महाराज शेळक॓दे, नितीन महाराज काकडे , सागर महाराज शिर्के, देवेंद्र महाराज निढाळकर यांची कीर्तने आयोजित केलेली आहेत. जागर या कार्यक्रमात पंचक्रोशीतील २६ गावांचा सहभाग आहे अशी माहिती सप्ताह मंडळाचे कार्यकर्ते श्री दत्तात्रय सुर्यवंशी यांनी दिली.
बातम्यांसाठी संपर्क : ९६०४९५४७३७ दैनिक सूर्योदय पुणे

error: Content is protected !!